गेल्या पाच दिवसांपासून,सातत्याने सुरु असलेली चक्रीवादळे,सुसाट्याचा वारा,गारपिट आणि मुसळधार पाऊसाचा सर्वात जास्त फटका संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तळागाळातील बेघर असून, पालांवर संसार थाटणाऱ्या आणि ग्रामीण भागातील,खेड्यापाड्यावरील गावकुसाबाहेर वस्ती तांड्यात राहणाऱ्या भटक्या-विमुक्तांच्या कुटूंबाना जास्त प्रमाणात बसत असून त्यांच्या निवार्याच्या तंबूचे, पालांचे,झोपडीचे आणि कच्च्चा घरांचे,कारंजा मानोरा तालुक्यात प्रचंड नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.अवकाळी पाऊसाने अनेकांचे झोपडीवजा घरांची टिनपत्रे उडून गेलीत.
तर कित्येकांचे पालाचे नुकसान होऊन अन्न पदार्थाची नासाडी झाल्याचे वृत्त आहे.शिवाय पालावरच्या लोकांना पोटाची खळगी भरण्याकरीता रोजगार मिळविण्यासाठीच्या आणि त्यांच्या लहानमोठ्या व्यवसायांना अवकाळी पाऊसाचा चांगलाच फटका बसत असल्याने त्यांचेवर उपासमारीची वेळ येत असल्याचे कटूसत्य आहे.त्यामुळे निदान आतातरी शासनाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून यांची तात्काळ जनगणना करून,त्यांचे पुनर्वसन करून त्यांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था करावी.तसेच समाजातील उदार अंतःकरणाच्या दानशूर मंडळीनी पुढे येऊन, अवकाळी पाऊसाच्या या संकटातून त्यांना सावरण्याकरीता आपआपल्या गावातील भटक्या विमुक्ताच्या तांडे,वस्त्या व पालावर मदत पोहचवून त्यांच्या पोटापाण्याची काळजी घ्यावी. असे विनम्र आवाहन भटक्या विमुक्ताचे कारंजा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते संजय कडोळे यांनी केले आहे.