लाखनी पोलिसांनी कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या सात जनावरांची एका वाहनातून सुटका केली. याप्रकरणी पीकअप वाहनचालकांसह दोनजणांवर कारवाई करण्यात आली. पीकअप वाहन (एमएच ३७ टी ३३१) चा चालक सुधीरदास भुरे व गाडीमालक अंकुश शिवचरण हटवार (रा. आंबागड ) यांच्यावर लाखनी पोलिस ठाण्यात प्राणी संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाखनी पोलिसांनी मुक्त केलेल्या जनावरांना भागिरथा गो- अनुसंधान बहुद्देशीय संस्था मालीपार येथे पाठविले आहे.. पोलिसांनी अलीकडे जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहतुकीकडे लक्ष वेधले आहे. दररोज एकना एक कारवाई जिल्ह्यात होत आहे. त्यानंतरही अवैध वाहतूक सुरूच आहे..