कारंजा : महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषद वाशिमला मिळालेल्या सविस्तर वृत्तानुसार, देशाची राजधानी नवी दिल्ली येथे, अत्यंत आनंदोत्साहात आपल्या महाराष्ट्राचे सांस्कृतिक कला सादरीकरण करण्यात आले आहे. याबाबत अधिक वृत्त असे की,महाराष्ट्र राज्याच्या ६३ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात, महाराष्ट्राच्या धार्मिक व आध्यात्मिक संस्कृतितील ऐतिहासिक असलेला पारंपारिक गोंधळ,भारूड,पोवाडा,अभंग गायनासह "महाराष्ट्र गीत"आदि समृध्द लोककलांच्या दमदार सादरीकरणाने राज्याच्या वैविद्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन महाराष्ट्र सदनात घडविण्यात आले.
सदर्हु सांस्कृतिक कार्यक्रमात महाराष्ट्रातील पुणे,शिरूर,इनामगाव, येथील शाहीर चंद्रकांत माने यांनी उत्कृष्ट पद्धतीने शाहिरी व छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे आणि गोंधळ,स्फुर्तिगिते, इत्यादी अनेक लोककला सादर केल्या. त्यांनी आपल्या रांगड्या आवाजात डफाच्या तालावर शिवाजी महाराजांच्या पोवाडयाने मनाचा ठाव घेणारा जबरदस्त ठेका धरला असता रसिक प्रेक्षकांनी टाळ्यांनी भरभरून दाद दिली.
शाहीर चंद्रकांत माने,गायक अनिल शिंदे(गोंधळ)
निवेदक अमोल जाधव (व्यवस्थापक)नृत्यआर्यन दादा आणि समूह,हार्मोनियम मुकुंद कोकाटे
संबळ अविनाश शिंदे,ढोलकी यश खडे,कोरस अमर शिंदे,कोरस अमित शिंदे,छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिकाप्रथमेश कोतवडेकर यांनी सादर केली होती.
कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनाच्या बँक्वेटहॉल मध्ये ०१ मे रोजी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. महाराष्ट्र सदनाच्या प्रभारी निवासी आयुक्त निवा जैन यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.यावेळी राजस्थान सदनाचे निवासी आयुक्त धीरज श्रीवास्तव,महाराष्ट्र सदनाचे सहायक निवासी आयुक्त डॉ राजेश अडपावार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि महाराष्ट्र सदन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या समृध्द लोक संस्कृतीचे प्रतिबिंब उभे केले आणि यास उपस्थितांचा उत्सफूर्त प्रतिसाद लाभला. महाराष्ट्र सदनात प्रभारी निवासी आयुक्त श्रीमती निवा जैन यांच्या हस्ते शाहीर चंद्रकांत माने आणि इतर गोंधळी कलाकारांचा सन्मान करण्यात आला. असे वृत्त संबधितांकडून महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना देण्यात आल्याचे त्यांनी कळवीले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....