अणु युध्दातून मानवजातीची किती अपरिमीत हानी होते, आणि नंतर त्याचे किती दुरगामी परिणाम भोगावे लागतात याचे स्मरण देणारा इतिहास या ऑगस्ट महिण्यातच जगासमोर आलेला होता.७७ वर्षापूर्वी १२ ऑगस्ट रोजी जापानमधील हिरोशिमा शहर अणुबॉम्बने उध्वस्त करण्यात आले होते. त्या जखमा, त्या वेदना नुसत्या जापानच्या नव्हे तर तो जगातील मानवतेवर झालेला हल्ला होता. यापासून बोध घेतल्यामुळेच आज शांततेची कांस धरणार्या देशांना युध्द नव्हे तर शांतता हवी आहे.”
अनेक वर्ष पारतंत्र्याच्या अंधःकारात मुक्ततेची धडपड करणारा आमचा भारत देश असंख्य क्रांतीकारकांच्या बलिदानातून अखेर स्वतंत्र झाला. त्या स्वातंत्र्याचा वर्धापन दिन आणि ७५ व्या वर्ष पूर्ततेचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आम्ही साजरा करीत आहोत.स्वातंत्र्य लढ्याच्या यज्ञकुंडात प्रसंगी समिधा होऊन अनेकांनी बलिदान केले. त्या अपार कष्टांतून, हाल अपेष्टांमधून या देशाला स्वातंत्र्य मिळाले. म्हणून भारतीय इतिहासात ती सुवर्णाक्षरांनी लिहिल्या गेलेली एक महत्वपूर्ण घटना ठरली.
आज कोरोना या विषाणुजन्य साथरोगाने जगासोबत भारतालाही पछाडलेले आहे.आता कुठे त्याची तिव्रता कमी होऊन त्या परिस्थितीतून सावरण्याचे प्रयत्न होत आहेत.गेल्या साथरोगाच्या आणि प्रचंड आर्थिक ओढाताणीच्या भीषण संकटात आपण फार मोठ्या गर्दीत मागील स्वातंत्र्यदिन साजरा करू शकलो नाही.तरी अमृतमहोत्सव जल्लोषात साजरा करण्याची संधी मात्र आम्हाला मिळत आहे.तो आनंद व्यक्त करतांनाच या दिवसाचा मतितार्थ लक्षात घेतला पाहिजे. आम्हाला हक्कांसोबत कर्तव्याच्या जाणीवेतून संकल्पांची वाटचाल करण्यानेच आम्हाला खर्या विकासाची पहाट दिसणार आहे. कोरोनाच्या मागील आपत्ती आणि आर्थिक संकटातून आम्ही आणि सत्ताधार्यांनीही आगामी काळाप्रती दुरदृष्टी ठेऊन काहीतरी नविन बोध घेऊन नवे बदल केले पाहिजेत. देशवासियांच्या जीवनात सुख समाधान आनंद निर्माण करुन त्यांचे जीवन सुरक्षित करण्याकरीता मुलभूत विकासाच्या योजनांची धडाक्याने सुरुवात केली पाहिजे. घर घर तिरंगा म्हणून राष्ट्रध्वजाला मानवंदना देतानाच प्रत्येक घरात सुख,समृध्दी,वैभव निर्माण करून समाजात आनंदाचे नंदनवन कसे फुलवले जाईल याच्या नियोजनाला सुरूवात झाली पाहिजे.दारिद्र्य आणि आर्थिक विषमता ही समाजाला लागलेली वाळवी असून तो राष्ट्राच्या आर्थिक विकासातील गतिरोधक आहे.त्याला पार करून राष्ट्र सृदुढ करण्याच्या कामाला सत्ताधाऱ्यांनी प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. लोकांनी आपले रक्त आटवून शासनाच्या तिजोरीत करस्वरूपाने जमा केलेल्या पैशांचा अनाठायी अपव्यय होणार नाही. तो जनतेच्या कल्याणकारी सत्कार्यातच कसा खर्च होईल या संवेदनशील कर्तव्यभावनांचा अंगीकार राजकीय नेत्यांनी केला पाहिजे.या देशात नुसत्या राजकारणासाठी कोट्यावधी रूपयांच्या डोंगर,झाडी,हटेलांचे लोकांच्या पैशांवर होणारे भामटे उद्योग बंद झाले पाहिजेत. विषमता आणि भ्रष्टाचार नियंत्रित करून सर्वच क्षेत्रातील
स्वच्छ पारदर्शक प्रशासकीय सेवा देशातील प्रत्येक माणसापर्यंत पोहचल्या पाहिजेत.
सर्वसामान्यांच्या व शेतकर्यांच्या जीवनातील अंधःकाराचा विचार करुन धर्म आणि जाती पातींचा उन्माद थांबवून त्यांच्यात सुरक्षित जीवनाचा विश्वास निर्माण केला पाहिजे. या विषयांवरुन वाढलेल्या व्देष आणि सुडांच्या भावनांचा उद्रेक थांबवून मानवतावादाच्या मार्गानेच देशाला उच्चतम प्रगतीच्या शिखराकडे नेण्याचा संकल्प या स्वातंत्र्यदिनी या देशातील जनतेसोबतच सत्ताधारी आणि राजकारण्यांनी करावा.असा सकारात्मक आशावाद आम्ही आज प्रातिनिधिक स्वरुपात व्यक्त करीत आहोत. मंदिर-मस्जिद वा अन्य प्रार्थना स्थळे वा मुर्त्यांच्या स्थापनांनी किंवा संस्कृतीचे कोरडे डोस पाजल्याने नानाविध सोंगाडे इव्हेण्ट करीत राहल्याने देशाचे आणि सर्वसामान्न्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. देशावरील संकटे टळणार नाहीत, ना जनतेच्या जीवनातील अनेक धोकादायक संकटांचे नानाविध कोरोना..! म्हणून जबाबदारी ओळखून लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी व देशाच्या विकासासाठी येथील लोकशाही आणि संविधानाला प्रथम दर्जाची प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे.
गेल्या ७५ वर्षात नागरिकांच्या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा पाहिजे त्या प्रमाणात पूर्ण झालेल्या नाहीत.आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि संशोधनाच्या क्षेत्रात देशाने घेतलेली गरुडझेप तशी उल्लेखनिय आहे.पण तळागाळातील जीवनमान सुधारण्यासाठी विकास आणि योजनांची,बेरोजगारी दुर करण्याची जी गती असायला पाहिजे ती बिलकूल समाधानकारक नाही.ती सुधारावी यासाठी सकारात्मक विचार करीत असतांना गेल्या सहा वर्षात प्रगतीच्या वाट्यातील झालेल्या चुका, राहिलेल्या उणीवा या वस्तुस्थितीचा विचार करणेही देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे. नुसता स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केल्याने राष्ट्रभक्ती सिध्द होणार नाती.तर देशातील प्रत्येक माणसाच्या जीवनात विकास आणि सुधारणांचा प्रकाश डोकावला पाहिजे.त्यासाठी ध्येयवादाने सतत सिध्द असणे हे खरे राष्ट्रप्रेम ठरणार आहे.
त्यासाठी झालेल्या गफलतींची पुनरावृत्ती होऊ न देता त्या राष्ट्रध्वजाला साक्षी ठेऊन देशातील प्रत्येक नागरीकाने सुध्दा उणीवांचे खापर फक्त शासन प्रशासनावर न फोडता प्रत्येक चांगल्या गोष्टीचा शुभारंभ स्वतःपासून केला पाहिजे. भविष्याकडे डोकावतांना नवे बदल स्विकारण्यास सिध्द झाले पाहिजे.
विविध क्षेत्रातून भौतिक प्रगती साधत असतांनाच सामाजिक स्थैर्य आणि देशाची सुरक्षितता अबाधित राखणे आणि त्याकरीता क्षणाक्षणाला दक्ष असणे आज अत्यंत आवश्यक झालेले आहे. या देशाच्या स्वातंत्र्याकरीता अनेक विरांनी तळहातावार प्राण घेऊन भारतमातेला मानवंदना दिली. त्याचप्रमाणे अनेक संशोधकांनी आयुष्यातील अख्खा काळ संशोधनात घालवून वैज्ञानिक क्षेत्रात आज आम्हाला स्वयंसिद्ध करुन ठेवले आहे. याची जाणीव समाजातील प्रत्येक घटकाने ठेऊन देशाच्या विकासाच्या वाटचालीत खारी एवढा वाटा उचलण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्याची तयारी दर्शविणे हिच स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनी त्या भारतमातेला दिलेली खरी मानवंदना ठरेल.
स्वातंत्र्यवीरांनी आपल्या बलिदानाने आम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिले. तसेच संशोधकांनी आपल्या तपस्येतून वैज्ञानिक प्रगती साधून आम्हाला सुलभ जीवन जगण्याच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या. एडीसनने हजारो प्रयोग करून विजेच्या दिव्याचा अखेर शोध लावला आणि आम्हाला अंधारातून प्रकाशात आणले. एकंदरीत हा सर्व इतिहास आठवून या देशाला प्रकाशाच्या वाटेने नेण्याकरीता आम्ही सुध्दा आमची कर्तव्याची बांधिलकी सिध्द केली पाहिजे. परंतू त्याऐवजी जात, पात, धर्म, पंथ आणि पक्षांच्या गजबजाटात समाजातील सद्भाव नाहिसे होऊन चौफेर निर्माण होत चाललेल्या असहिष्णुतेच्या सावटाने सामाजिक स्वास्थ आज धोक्यात आलेले आहे. ते टाळण्याकरीता काय करावे याचा विचार आम्ही केला पाहिजे. एका विशिष्ट दिशेने वाटचाल करणार्या बलाढ्य भारताचे आज जगातील अनेक देशांना एक आकर्षण आहे. भारताची संस्कृती, आध्यात्मिक प्रगती या देशाची शक्ती आहे. या नेत्रदिपक प्रगतीचे रहस्य आज जगाच्या लक्षात यायला लागलेले आहे. मानवजातीचा खराखूरा विकास साधायचा असेल तर अंतर्गत शांतता आणि शेजारी राष्ट्रांशी सलोख्याचे संबंध ठेवण्याची आवश्यकता प्रत्येक देशाने ओळखली आहे. ती शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न आंतरराष्ट्रीय पातळीवरून होत आहेत. परंतू तरीही अखंड अशांततेत राहण्यातच आनंद मानणारे पाकिस्तान आणि चिन हे कुरापती देश या शांततेला तडा देऊ पाहत असतात.अणु युध्दातून मानवजातीची किती अपरिमीत हानी होते, आणि नंतर त्याचे किती दुरगामी परिणाम भोगावे लागतात याचे स्मरण देणारा इतिहासही या ऑगस्ट महिण्यातच जगासमोर आलेला होता.८६ वर्षापूर्वी १२ ऑगस्ट रोजी जापानमधील हिरोशिमा शहर अणुबॉम्बने उध्वस्त करण्यात आले होते. त्या जखमा, त्या वेदना नुसत्या जापानच्या नव्हे तर तो जगातील मानवतेवर झालेला हल्ला होता. यापासून बोध घेऊन आज शांततेची कास धरणार्या देशांना युध्द नव्हे तर शांतता हवी आहे.
देशात शांतता प्रस्थापित करुन विविध क्षेत्रातून विकासाच्या दिशेने जाणार्या भारतापुढे आज येणार्या आपत्ती आणि दहशतवादासारख्या अंतर्गत समस्यांमध्ये वाढ झालेली आहे. परकीय दहशतवादाला तोंड देतांनाच अंतर्गत दहशतवाद हे सुध्दा मोठे संकट देशात डोके वर काढत आहे. सर्व देश काश्मिरमधील अस्थिरतेने व देशाअंतर्गतच्या असुरक्षिततेने चिंतातूर आहे. तरीही आमच्याकडे वाकडी नजर टाकणार्या शेजारी राष्ट्रांशी मुकाबला करण्याकरीता भारत आज बराच सक्षम आहे. देशाच्या प्रगतीकरीता उच्च पातळीवरुन अनेक क्षेत्रातून मिळणार्या योगदानातून विकास साधला जात आहे.त्याची गती वाढण्याची गरज आहे.ती अधिक वाढविण्याकरीता समाज आणि शासनप्रशासनात भेडसावणार्या समस्या दूर होणे आवश्यक आहे. थांबविणे आवश्यक आहे. आज देशपातळीवरील समस्यांचे स्वरुप भिषण बनलेले असतांना समस्त देशवासियांनी जात, धर्म, संप्रदायांचे भेद पार करुन एकात्मतेच्या राष्ट्रीय भावनेने एकत्र येणे काळाची गरज आहे. परंतु दुर्दैवाने प्रादेशिक, धार्मिक आणि जातीय व्देषाचे बिज अंकुरीत होऊन त्याचे परिणाम आज देशातील माणसांना भोगावे लागत आहेत. धर्म आणि जातीच्या नावाखाली दंगलींनी देशाच्या संस्कृतीला धक्का पोहचविला असून त्याचे परिणाम सर्वांगिण प्रगतीवर होत आहेत. देशावरील संकटांचा एकत्रीत येऊन मुकाबला करण्याकरीता आम्ही आपसातील क्षुल्लक वादांना बाजुला ठेऊन काळाजी गरज असलेल्या राष्ट्रकार्याकरिता सज्ज झालो पाहिजे. त्याकरिता स्वहितापेक्षा देशहिताला महत्त्व देण्याचा विचार राजकारणी आणि सामान्य जणांच्याही मनामनात रुजणे आवश्यक आहे. म्हणून धर्माधतेचा उन्माद बाजुला ठेऊन मानवतावाद आणि आर्थिक,सामाजिक विषमतांचे उच्चटणानंतरच देशाचा खरा विकास होऊ शकतो हा विचार होण्याची गरज आहे...!.
आपल्या प्रतिक्रिया द्या....