स्वत:च्या मतलबी राजकारणासाठी पत्रकारांचा उपयोग करणे आणि त्यातही कुटील राजकारण करून मुंबई च्या शहरी मिडीयातील पत्रकार आणि स्थानिक ग्रामिण पत्रकार असा भेद करून फुट पाडणे आणि त्यांची मते आपसात कलुषित करून आपली दुकानदारी चालविणाऱ्या नेत्यांचा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेने जाहिर निषेध केला आहे.याचसोबत सध्या महाड दौऱ्यामध्ये अशा कुटील घाणेरड्या उद्योगांची पूनरावृत्ती करून कोकणातील ग्रामीण पत्रकार बांधवांना अपमानित करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांचा निषेध करण्यासाठी संस्थापक -राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख व संपूर्ण राज्यातील आणि कोकणातील पत्रकार या निषेध मोहिमेत सहभागी झाले आहेत.
सामाजिक बांधिलकी आणि मिडीया तथा अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे पोवाडे गाणाऱ्या भाजपनेत्यांना आणि किरिट सोमय्यांना कुठेही जातांना फक्त मुंबईची मिडीया सोबत लागते. त्याबध्दल पत्रकारांचे दुमत नाही, परंतू मुंबईकर पत्रकार सोबत आहेत म्हणून स्थानिक पत्रकारांची गरज नाही असे दर्शवून त्यांना अपमानित करणे महाराष्ट्रातील स्वाभिमानी पत्रकार कदापीही मान्य करणार नाहीत.
प्रगत मिडीयाच्या प्रवाहात पत्रकारितेचे संपूर्ण ज्ञान घेऊन ग्रामीण भागातील पत्रकार वृत्तांकनाच्या कार्याची जबाबदारी उत्तमरितीने पार पाडत आहेत.असे असतांना त्यांची शुल्लक म्हणून गणना करून अपमानास्पद वागणूक देणे संपूर्ण मिडीया तथा सेवाव्रती पत्रकार बांधवांचा तथा वृत्तपत्र सृष्टीचा अवमान आहे.महाडमधील दौऱ्यात हॉटेलमध्ये उतरलेल्या किरिट सोमय्यांसोबत मुंबईतील मिडीया प्रतिनिधी होते.म्हणून महाडमधील स्थानिक पत्रकारांना अपमानस्पद वागणूक देऊन अरेरावी करून त्यांना बाहेर काढण्यात आले. याची दखल किंवा आपल्याच बांधवांना दिल्या जाणाऱ्या अशा वागणूकीला अटकाव करण्याची तयारी मुंबई तील मिडीया बांधवांनीही दाखवू नये ही एक दुर्दैवी बाब तर आहेच,सोबतच मुंबई तील मिडीयामालकांनीही आपले प्रतिनिधी तेथे असतांना त्यांचेवर अन्याय करून मुंबई चे प्रतिनिधी नेत्यांसोबत पाठविण्याची पक्षपाती वागणूक समर्थनिय निश्चितच नाही.अशा मग्रूर,दगेबाज,मतलबी नेत्यांना खास वागणूक देऊन त्यांना पत्रकारांना अपमानित करण्याची संधी देणे हे मिडीयाच्या अस्तित्वावर घोंगावणारे एक चिंताजनक संकट आहे.
पत्रकारांमध्ये फुट पाडून त्यांची किंमत कमी करून या चौथ्या स्तंभाला हादरा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशा नेत्यांचा लोकस्वातंत्र्य पत्रकारमहासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख,सर्व केन्द्रीय पदाधिकारी,पालघरमधून कोकणविभागीय संघटन तथा संपर्कप्रमुख शेख आशाद,संतोष राणे,जगदिशप्रसाद करोतिया,प्रात:कालचे संपतलाल उजाला,संतोष घरत,गुलाम मोहम्मद खान व राज्यातील समस्त पत्रकारांनी कडक शब्दात निषेध केला आहे.या कुटील मिडीयासाठी विघातक भुमिका अवलंबण्याच्या अनैतिक कृत्त्याबध्दल भाजप आणि किरिट सोमय्यांनी जाहिर माफी मागावी अशी मागणी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाने केली आहे.