भारत देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे सहजासहजी मिळाले नाही. या स्वातंत्र्यासाठी अनेक हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. त्यामुळे स्वातंत्र्याचा रक्तरंजित क्रांतीचा इतिहास सदैव स्मरणात ठेवून देशप्रेम जपावे असे प्रतिपादन राज्याचे विरोधीपक्षनेता विजय वडेट्टीवार यांनी केले.
ते ब्रम्हपुरी येथील स्टेम पोदार स्कुल मध्ये आयोजित स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या निमित्ताने मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाच्या निमित्ताने नगरसेवक डॉ नितीन उराडे, अॅड. भास्कर उराडे, डॉ. रविशंकर आखरे, श्री. शेलोकार, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, समन्वयीका वैशाली उराडे, मुख्याध्यापक प्रवीण ढोले, पीजेके मुख्याध्यापिका प्रीती काळबांडे यांसह विद्यार्थी व पालक यांची उपस्थिती होती.
यावेळी स्कुलमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये तालुकास्तरीय बुध्दीबळ स्पर्धेत प्रथम क्रमांकाने व द्वितीय क्रमांकाने पटकावलेल्या आर्या बगमारे व संबोधी सोनटक्के यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गायन, समुह नृत्य सादर केले. सोबतच स्वातंत्र्यदिनावर पोर्णिमा गायकवाड व जय नाकतोडे यांनी भाषण केले.
प्रश्नमंजुषा स्पर्धेत उपस्थित पालक व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सायन्स आलंपियाड फाउंडेशन मध्ये इंटरनॅशनल रॅक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक प्रवीण ढोले यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व समजावून सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅली टहलियानी, राऊत मॅडम, रेश्मा मासुरकर यांनी केले. आभारप्रदर्शन शिरीन शेख यांनी केले.
यशस्वीतेसाठी कोमल बुलबुले, मेघा ढेंगरे, अनुराधा चंद्रगिरीवार, शितल वाघुरकर, सारिका कोल्हेकर, प्रसेनजित कोल्हे, उमेश राऊत, मयुर बोमनपल्लीवार यांनी सहकार्य केले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....