अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा अकोला तर्फे आज भाऊसाहेब लहाने सभागृहात "द्विग्विजय दिन", कार्यक्रम अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.या वेळी प्रमुख वक्ता म्हणून जेष्ठ विधीज्ञ श्रीनिवास खोत होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला संघ सचिव अॅड सौ पूनम देशपांडे यांनी केले.दीपप्रज्वलन व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.ग्राहक गीत मनोज अग्रवाल सचिव यांनी म्हंटले.प्रास्ताविक हेमंत जकाते जिल्हा संघटनमंत्री यांनी केले.अॅड श्रीनिवासजी खोत यांनी आपल्या भाषणाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.अध्यक्षीय समारोप जेष्ठ मार्गदर्शक श्री.सुधाकरराव जकाते यांच्या भाषणाने झाला.आभार प्रदर्शन दिनेश पांडे अध्यक्ष यांनी केले.सामुहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रमासाठी विनोद मेहरे उपाध्यक्ष आणि प्रमोद बोरकर पेट्रोल व गॅस संघ सचिव यांनी परिश्रम घेतले.