ब्रम्हपुरी- डॉ.पंजाबराव देशमुख काॅन्व्हेंन्ट ब्रम्हपुरी येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष प्रा.प्रकाशजी बगमारे व संस्थेच्या उपाध्यक्षा तथा काॅन्व्हेंन्टच्या प्राचार्या मनिषाताई बगमारे यांच्या हस्ते कृष्णमुर्तीच्या पुजनाने करण्यात आली.
विद्यार्थ्यांनी राधाकृष्णाची वेशभूषा व रंगीबेरंगी कपडे परिधान करून सर्व वातावरण अगदी गोकुळमय तयार केलं होतं.जवळपास १५० विद्यार्थी यांनी श्रीकृष्ण व राधा यांच्या वेशभुषा करून कार्यक्रमात विशेष रंगत आणली .
यानंतर विद्यार्थ्यांनी सांघिकतेचे महत्त्व पटवून देवून दहीहंडी फोडल्यानंतर खाऊवाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.