अकोला: स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या लुईस ब्रेल वाचक व लेखनिक बँक अकोला तर्फे डॉ.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी वाचक व लेखनिक पुरवले जात आहेत . सत्र 2024 मध्ये वर्ग बारावीच्या विद्यार्थ्यांना *दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे . श्री शिवाजी महाविद्यालयाचा वर्ग १२ वी मध्ये शिकणारा अंध विद्यार्थी धीरज सुपाजी ढोले याला कु.गौरी दिपक पातोंड व आर. डी. जी महिला महाविद्यालयात शिकणारी अंध विद्यार्थिनी संजीवनी सत्येंद्र पंचवाटकर हिला विवेक रणजित जाधव हे वाचक व लेखनिक पुरवल्या गेले*. सदर दोन्ही अंध विद्यार्थ्यांनी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे दिलेल्या सहकार्याचे सोने करून वर्ग बारावी मध्ये घवघवीत यश संपादन केले . *संजीवनी पंचवाटकर हिला 73 टक्के तर धीरज ढोले याला 60 टक्के गुण प्राप्त झाले* . हे दोन्ही विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय आपले पालक शिक्षक व दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे संस्थापक अध्यक्ष डॉ.विशाल कोरडे यांना देतात . *वेळोवेळी डॉ.कोरडे यांनी आपल्या अपंगत्वावर मात करून आम्हाला अभ्यास कसा करायचा ? याचे मार्गदर्शन केले* *ब्रेल लिपी च्या साह्याने नोट्स उपलब्ध झाल्या त्याचबरोबर संस्थेच्या वाचक लेखनिक बँकेतर्फे आम्हाला अभ्यासक्रम ध्वनिमुद्रित करून दिला होता ज्या द्वारा वर्ग बारावीचा अभ्यासक्रम आम्ही मुखोदगत केला . परीक्षेत वाचक व लेखनिक म्हणून कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांनीही आम्हाला वेळोवेळी अभ्यासात मदत केल्याचे हे अंध विद्यार्थी सांगतात* . हे दोन्ही अंध विद्यार्थी भविष्यात दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या माध्यमाने स्पर्धा परीक्षा देऊन आपले भविष्य घडवणार आहे . समाजातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाच्या लुईस ब्रेल वाचक व लेखनिक बँकेसाठी मदतनीस म्हणून सहकार्य करण्याचे आव्हान या दोन्ही दिव्यांग विद्यार्थ्यांनी केले आहे . *वाचक व लेखनिक बँकेत नाव नोंदणी करण्यासाठी ९४२३६५००९० या संस्थेच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क* साधून नोंदणी करावी अशी माहिती आमच्या प्रतिनिधीशी बोलताना लुईस ब्रेल वाचक व लेखनिक बँक अकोला चे सदस्य संचिता चव्हाण, अनामिका देशपांडे, वैष्णवी मानकर, भाग्यश्री गोडे, सुजाता आसोलकर, नयना लवंगे व निखिल गवई यांनी दिली आहे .