अकोला:-
गेल्या २० वर्षा पासून माजी सैनिकाच्या समस्या साठी लढा देणारी संघटना दर वर्षी १० वि मधील गुणवत विध्यार्थीचा सत्कार व धार्मिक व सामाजिक कार्यामध्ये सदैव अग्रेसर असलेल्या कर्ता हनुमान मंडळाच्या वतीने गेल्या १७ वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्यामध्ये दहावी, सह विविध परीक्षांमध्ये घवघवीत यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार दरवर्षी करण्यात येतो. दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा मंगळावारी दिनांक २० मे रोजी मंडळाच्या वतीने यावर्षीच्या १० परीक्षेत घवघवीत यश मिळवून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार अमर जवान माजी सैनिक संघटना व कर्ता हनुमान मंडळा वतीने आयोजित करण्यात आला. त्यामध्ये अकोला शहरातील टॉपर कू अनुष्का एकनाथ खेडकर १००%,दुसरीटॉपर कू श्रुती हेमंत पाथरीकर ९९, ४०%, चि कृष्णा भगवान लव्हाळे ९९%, कू कृष्णाली गजानन माळी ९६, २०%, कू रिया अशोक उदयावाल ९२,६०%, कू श्रेया संतोष करागले ९१,६०%, कू सेजल प्रकाश वाघमारे ८९, ४०%, कू समुद्री विध्यादास झाबरे ८०%, कू आनंदी चिकटे ७०% आदी विद्यार्थ्यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे संचालन गजानन धरमकर यांनी केले तर प्रास्ताविक अमर जवान माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष माजी सैनिक सुभाषराव म्हैसने यांनी केले. आभार प्रदर्शन माजी सैनिक लक्ष्मण मोरे यांनी केले कार्यक्रमाला डॉ. अशोक ओळबे, माजी नगर सेविका सौ. मंगला म्हैसने, अमर जवान माजी सैनिक संघटनेचे उपाध्यक्ष माजी सैनिक सुरेश वडे, शुभेदार बोदडे साहेब,ह भ प वाडकर महाराज,माजी सैनिक वानखडे, माजी सैनिक आतिष सिरसाट,शांताराम रोहनकार, एकनाथ खेडकर, संजय दांदळे वसंता माळी, चंद्रकांत ताठे, भिकाजी भगत, प्रल्हाद शेळके, वसंत जायदे, भागवत गिरी, महादेव खडसाळे, प्रकाश कुलट, अशोक भिलकर, वकील संतोष गोळे, विलास आगरकर, राजेंद्र मालानी, गजानन माळी, संजय वेध,देवालाल उजाडे, मुरलीधर आवटे, तानाजी देवकते, मुरलीधर अंधारे, शरद कोकाटे,दिवाकर देशमुख, गजानन माळी, शरद लोटे, मोहनसिंग ठाकूर, गजानन माळी (मंडप वाले) वकील विध्यादास झाबरे, प्रकाश जाधव, ज्ञानदेव बदरखे, राजेश चिकटे, सेलसिंग सिसोदिया, राजेंद्र मालानी, शरद लोटे, गजानन खरोडकर, सौ ममता लवाळे, सौ पाथरीकर, सौ लवाडे,सौ सीला मगर यांच्यासह परिसरातील नागरिकांची व पालकांची उपस्थिती होती.
आपल्या प्रतिक्रिया द्या....