कारंजा (लाड) : वाशिम जिल्ह्यातील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते, दिव्यांगाच्या प्रती आस्था ठेवणारे जनसेवक व काँग्रेसचे सक्रीय व निष्ठावंत कार्यकर्ते वाशिम जिल्हा काँग्रेस सेवादलाचे माजी जिल्हा समन्वयक व शहर युवक काँग्रेस चे माजी अध्यक्ष अँड.संदेश माणिकचंद जिंतुरकर यांची वाशिम जिल्हा काँग्रेस च्या सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार व प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार तसेच प्रदेश सचिव दिलीप भोजराज यांच्या निर्देशानुसार वाशिम जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार अमित भाऊ झनक यांनी ॲड संदेश माणिकचंद जिंतुरकर यांची नियुक्ती केली आहे.
गेल्या 25/30 वर्षांपासून ॲड संदेश जिंतुरकर राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्य करीत असुन रचनात्मक व विधायक काम करण्याची ॲड संदेश जिंतुरकरांची हातोटी आहे.
युवक काँग्रेसचे अध्यक्ष असतांना संदेश यांनी केलेले कार्य अजुनही जनतेच्या स्मरणात असुन उच्च शिक्षित, शांत , प्रेमळ व मनमिळाऊ तसेच सुस्वभावी सुसंस्कृत घराण्यातील व सहसा कोणत्याही वादात न पडणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ॲड संदेश जिंतुरकर यांची शहरात ख्याती आहे
आजपर्यंत केलेल्या आपल्या कार्याची दखल घेतल्याबद्दल देवानंदभाऊ पवार दिलीप भोजराज व ॲड.दिलीपभाऊ सरनाईक यांचे संदेश जिंतुरकर यांनी आभार मानुन त्यांना आपल्या नियुक्ती चे श्रेय दिलं आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. दिलीप सरनाईक, वाशिम जिल्हा काँग्रेस सेवादल चे अध्यक्ष डाॅ.विशाल सोमटकर, शहर कॉग्रेस चे अध्यक्ष अमीर खान पठाण, तालुका अध्यक्ष राज चौधरी, उमेश शितोळे,रमेश पाटील लांडकर, विजय देशमुख, इमरान शेख, ॲड वैभव ढगे, सचिन पाटील, शोराब खांन पठाण आदी नी संदेश जिंतुरकर यांच्या या नियुक्तीबद्दल संदेश चे अभिनंदन केले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....