गेलेल्या मार्च महिन्यामध्ये बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात कोल्हापूर सांगली सातारा येथील जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना वाटेगाव ता वाळवा जिल्हा सांगली या ठिकाणी जाऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि वीर पुरुष फकिरा रानोजी साठे या दोन्ही महापुरुषांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि वीर पुरुष फकिरा रानोजी साठे यांच्या समाधीला नतमस्तक होऊन अभिवादन केले
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि वीरपुरुष फकिरा रानोजी साठे यांचे कुटुंब अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहे. या दोन्ही कुटुंबीयांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या कडून काही काही आर्थिक मदत मिळाली पाहिजे या सामाजिक भावनेतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना आपण लवकरच निवेदन देऊन आर्थिक मदतीची मागणी करणार असे आश्वासन बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि वीर पुरुष फकिरा रानोजी साठे यांच्या कुटुंबीयांना दिले होते
दि,22/3/2022 रोजी मुंबई मंत्रालय येथे जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन देऊन अण्णाभाऊ साठे आणि फकिरा रानोजी साठे या दोन्ही कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी म्हणून निवेदन दिले होते पंडित भाऊ दाभाडे यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन समाज कल्याण राज्यमंत्री धनंजय मुंडे यांची बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी नुकतीच मंत्रालय मुंबई येथे जाऊन भेट घेऊन सविस्तर चर्चा करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि वीर पुरुष फकिरा रानोजी साठे या महामानवाच्या दोन्ही कुटुंबीयांना महाराष्ट्र शासन यांच्याकडून लवकरात लवकर आर्थिक मदत मिळाली या विषयावर चर्चा केली ,समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि वीरपुरुष फकिरा रानोजी साठे या महामानवाच्या कुटुंबीयांना शासनाच्या समाज कल्याण विभागाकडून लवकरात लवकर आर्थिक मदत देण्याचे आश्वासन बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडीत भाऊ दाभाडे यांना दिले अशी माहिती बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे