कारंजा : श्रीक्षेत्र कारंजा शहरातील बालाजी नगर भाग -२ कारंजा येथे, कारंजा शहरातील पहिल्या श्री साईबाबा वाटिका मंदिराचे निर्माण कार्य प्रगती पथावर असून सध्या तेथे, सोमवार दि.२० मार्च २०२३ पासून दररोज दुपारी ०१:०० ते ०४ : ०० पर्यंत,वृंदावन धामच्या साध्वी चित्रादिदी वाकडे ( माऊली ) यांच्या अमृतमय वाणीमधून, संगीतमय श्रीमद भागवत कथा सप्ताह सुरु आहे. आणि सप्ताहानिमित्त सोमवार दि. २७ मार्च २०२३ रोजी दुपारी १ : ३० वाजता, भव्य अशा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे .
तसेच मंदिरामध्ये दि २७ मार्च २०२३ रोजीच साईबाबाच्या मनमोहक अशा दिव्य साई मुर्तीची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. अत्यंत रमणीय असे मनमोहक श्री साईबाबा वाटिका मंदिराचे बांधकाम सुरूच असून, मंदिराला दानशूर साईभक्ताच्या आर्थिक सहकार्याची नितांत आवश्यकता आहे . तरी साईबाबाच्या भक्तमंडळीनी तन मन धनाने "फुल नाही तर फुलाची पाकळी" परंतु स्वेच्छेने जास्तित जास्त आर्थिक देणगी देऊन साईबाबा वाटिका मंदिराला आणि दि २७ मार्च २०२३ रोजी होणाऱ्या साई अन्नदान महाप्रसादाकरीता सढळ हाताने जास्तित जास्त आर्थिक सहकार्य किंवा तेल, दाळ, किराणा सामुग्री किंवा धान्य रूपाने स्वतः श्री साईबाबा वाटिका मंदिर बालाजी नगरी भाग २ कारंजा येथे दानशूर मंडळीनी स्वतः आणून द्यावी. किंवा श्री किशोर धाकतोड यांचेशी मो. नं. 9922511947 वर संपर्क साधावा. किंवा सोबतचा क्यू आर कोड स्कॅन करून ऑनलाईन सहकार्य पाठवावे असे आवाहन श्री साईबाबा वाटिका मंदिर कारंजा कडून करण्यात आलेले असल्याचे वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी साई भक्तांकरीता केले आहे.