वाशिम : हल्ली विधानसभा निवडणूकीचे वारे वहात असून, निवडणूक रणमैदानात,अनेक पर जिल्ह्यातील नवखी नेतेमंडळी, आपली विधानसभेची उमेद्वारी दाखल करण्यासाठी, दहापाच स्थानिक कार्यकर्त्यांना हाताशी धरून त्यांची प्रचार यंत्रणा राबवीत आहेत.यापैकी तर काही स्वतःच कुबेर असल्याचे भासवून,दानशूरतेचा आव आणीत असल्याचीही चर्चा आहे. मात्र ह्या रणधुमाळीत हे नेते, . पत्रकारितेत संपूर्ण हयात घालवीलेल्या सच्च्या पत्रकारांना दुर्लक्षित ठेवत असून, साप्ताहिकाच्या लघु पत्रकारांना यांचेकडून पत्रकार परिषदेचे निमंत्रण नाही की यांच्या जाहिराती नाही.त्यामुळे महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेने यांच्या भविष्यातील कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असून, या संदर्भात बोलतांना अध्यक्ष संजय कडोळे म्हणाले, "साप्ताहिकाच्या लघुपत्रकारांना डावलण्याची यांना मोठी किंमत मोजावी लागेल." निवडणूकीत यांचे पितळ उघडे पाडून यांना यांची जागा दाखवून द्या असे त्यांनी म्हटले आहे.