वाशिम : लोकसभा - विधानसभा निवडणूकीमध्ये मतदार जनजागृती करीता जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., मुख्यकार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या मार्गदर्शनात रिल्स बनवून मतदार जनजागृती केल्याबद्दल रिल्सचे निर्माते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ब्राम्हणवाडा येथील सहाय्यक शिक्षक किशोर शामराव कांबळे यांचा महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांचे उपस्थितीत, रविवार दि. 26 जानेवारी 2025 रोजी सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. उल्लेखनिय म्हणजे त्यांचेसह रिल्स मधील प्रमुख कलावंत कु. अमृता रामेश्वर पचांगे यांना देखील प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असतांना विदर्भ लोककलावंत संघटना,महाराष्ट्र गोंधळी समाज संघटना,महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषद तथा साप्ताहिक करंजमहात्म्य परिवाराच्या वतीने अध्यक्ष संजय कडोळे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.