वरोरा वणपरिशेत्र अधिकारी, कर्मचारी यांच्या गस्ती दरम्यान मौजा उखर्डा सर्वे नं 28 या झुडपी जंगलामध्ये विनोद किसन राऊत व 21 वर्ष व विनोद विनायक पवार वय 30 वर्ष रा. उमरविहीर ,पो. मुसळा, जिल्हा यवतमाळ हे संशयास्पद स्थितीत आढळून आले. वन अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता त्यांच्याकडून एक जिवंत ससा, बजाज सिटी 100 मोटरसायकल, वन प्राण्याचे शिकारी करता लागणारे साहित्य जप्त करण्यात आले. भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम9, 51 अन्यवे गुन्हा नोंदविण्यात आला पुढील चौकशी प्रशांत खाडे, विभागीय वन अधिकारी चंद्रपूर ,आदेश कुमार शेंडगे ,सहाय्यक वनरक्षक चंद्रपूर वनविभाग ,यांच्या मार्गदर्शनात सतीश किसन शेंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, वरोरा. दिवाकर चांभारे, शेत्र टे मुर्डा ,जितेंद्र लोणकर, क्षेत्र सहाय्यक शेगाव ,संजय खोब्रागडे, क्षेत्र सहाय्यक वरोरा .अमोल तिखट वनरक्षक ,अमोल नेवारे वनरक्षक अजनगाव करीत आहे. सदर जंगल लगत परिसर मध्ये संशयास्पद व्यक्ती दिसून आल्यास वनविभागस कळवावे असे आवाहन सतीश के. शेंडे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी सांगीतले