तालुक्यातील गोगाव येथील अपघातग्रस्त तरुण युवकाला गोगांव गाववासी व आदिवासी माना जमात मंडळ, मी मराठा क्रि.क्लब गोगांव यांनी आर्थिक मदतिचा हात देवुन सामाजिक बांधीलकी जोपसली.!
बुद्धिमत्ता, विचारशक्ती, भावना या मनुष्यप्राण्याला मिळालेल्या देणग्या आहेत. त्यांचा वापर त्याने योग्य तऱ्हेने, योग्यवेळी, योग्य ठिकाणी करणे अपेक्षित आहे. नाहीतर इतर प्राणिमात्र आणि मनुष्य यांच्यात फरकच उरणार नाही. यातून मनुष्य जर सत्प्रवृत्त असेल, निदान त्याच्यातील कृतज्ञतेची भावना मारली गेली नसेल, तर इतरांसाठी काहीतरी करण्याची भावना वाढीस लागते.
याचाच प्रत्यय म्हणजे गोगाव येथिल अपघातग्रस्त युवक सुरज गजबे वय २१ दुचाकीच्या अपघातात गंभीर जखमी झाला. कुटुंबाची परिस्थीती नाजूक असल्यामुळे पोट भरावं कि उपचार करावं असा गंभीर प्रश्न उभा होता. त्यातच ब्रम्हपुरी तालुक्यातील गोगांव येथील ग्रामवासी व आदिवासी माना जमात मंडळ, मी मराठा क्रि.क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने अपघात ग्रस्त सूरज ला आर्थिक मदतीचा हात देण्यात आला.
आर्थिक मदतीचा हात देतेवेळी गोगाव येथील त.मु.स.अध्यक्ष.तुळशीरामजी वाकडे,मी.म.क्रि.क्ल.अध्यक्ष गुरुदेवजी नन्नावरे,अखिल भोयर ,सुरज भोयर,समिर चौधरी व इतर गावातील मान्यवर उपस्थित होते.