वाशिम : संपूर्ण वाशिम जिल्ह्यासह कारंजा तालुक्यात दि. 20 जुलै 2024 पासून रिमझिम पण सततधार पाऊस सुरू असून,येत्या तिन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सदर पाऊस हा मुरौती पाऊस होत असल्याने त्याचा कापूस तुर पिकाला चांगला लाभ होणार आहे. शिवाय परिसरातील शेततलाव,पाझर तलाव,धरणे भरण्याची देखील शक्यता आहे. जिल्ह्यातील सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक गोपाल विश्वनाथ गावंडे यांनी दि. 04 जुलै 2024 रोजीच जुलैच्या पावसाविषयी आणि खरिपाच्या हंगामा विषयी अनुकूल असे पूर्वानुमान देवून बळीराजा व ग्रामस्थ यांना आश्वस्त केले होते. त्यांच्या अंदाजाप्रमाणे संपूर्ण जुलै माहिन्यात आणि पुढील महिन्याच्या दि. 06 ऑगष्ट पर्यंत विदर्भ, मराठवाडा, खान्देश, उत्तर महाराष्ट्र,कोकण,पश्चिम महाराष्ट्रात चांगला मुसळधार पाऊस होऊन महाराष्ट्रातील सर्वच धरणातील जलसाठा पूर्ण होण्याची शक्यता आहे.तसेच पश्चिम विदर्भापेक्षा जास्त प्रमाणात पूर्व विदर्भात यवतमाळ,वर्धा,चंद्रपूर,भंडारा, गडचिरोली,नागपूर इत्यादी जिल्ह्यांत जास्त प्रमाणात पाऊस होऊन नदी नाले तुडूंब भरून वाहण्याची शक्यता आहे.त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांनी पाऊसा पासून सुरक्षित राहण्या करीता, पुराचे पाणी असतांना नदी,नाले, पांदण रस्ते,धरण व धबधब्याजवळ जाऊ नये.पुराचे पाण्यामधून आपली वाहने, बैलबंडी,जनावरे नेऊ नये.विजा कडाडत असतांना मोबाईल बंद ठेवावेत.मोबाईल फोनचा वापर टाळावा. पावसापासून स्वसंक्षणा करीता शेतातील हिरव्या झाडाचा आश्रय घेऊ नये तसेच झाडांखाली आपली जनावरे, शेळ्यामेंढ्या बसवू नये.असे वृत्त संवादादरम्यान जिल्ह्यातील ग्राम रुईगोस्ता येथील हवामान अभ्यासक गोपाल गावंडे यांनी कळविल्याचे महाराष्ट्र राज्यस्तरीय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी सांगितले आहे.