भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डाॕ. ए. पी. जे. अब्दूल कलाम यांचा जन्मदिन हा "वाचन प्रेरणा दिन" म्हणून आयोजित यवतमाळ जिल्हास्तरीय वाचन मॕराथाॕन स्पर्धेत पुरुषोत्तम बैसकार, यवतमाळ यांनी सहभाग घेऊन वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीता य ग्रंथाचे वाचन करून २० पेज समीक्षण (लेखन) केले.
व यवतमाळ जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मा. श्री श्रीकृष्ण पांचाळ, जि. परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, यवतमाळ यांचे हस्ते श्री पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर यांना प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह प्रदान करण्यत आले.
हा कार्यक्रम यवतमाळ ग्रंथोत्सव २०२२ म्हणून साजरा करण्यात आला. यात पुस्तक प्रदर्शनी व विक्री करण्यात आली. अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आली.