कारंजा (लाड) : अखेर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक क्षेत्रातील महान, युवा उगवता वैज्ञानिक तारा अयान खानचे प्रेत,थेट ब्रिटनवरून,राज्याच्या मुख्यमंत्र्याचे उपसचिव अमोल पाटणकर यांच्या अथक प्रयत्नातून महाराष्ट्र शासनाच्या मदतीने कारंजा (लाड) येथे आणण्यात यश आले असून, नागपूर विमानतळावरून निघाल्यानंतर सकाळी पावणे नऊच्या सुमारास पोहचताच, त्याच्या चाहत्याचा हजारोच्या संख्येत हिंदू मुस्लिम बांधावाचा गोतावळा जमला होता. सर्वत्र शोकाकुल वातावरणात तरुण वैज्ञानिकाच्या मृत्युची हळहळ व्यक्त होत होती.ठिक १० :०० वाजता दारव्हा रोडवरील कब्रस्थाना समोरच्या मैदानात नमाज ए जनाजा अदा करण्यात येऊन मुस्लिम पद्धतीनुसार दफनविधी करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच खासदार संजयभाऊ देशमुख त्वरेने सांत्वनासाठी धावून आले. अयान खानच्या कुटुंबियाची त्यांनी भेट घेऊन सांत्वन केले. त्यावेळी खासदार संजयभाऊ देशमुख मित्र मंडळ,वहिदभाई मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.याबाबत मिळालेले सविस्तर वृत्त असे की, बिटन मधील एडीनबर्ग येथे हारलौ जलाशयात बुडून दि.२५ ऑगस्ट २०२५ रोजी अयान खानचा मृत्यु होऊन निधन वार्ता भारतिय दूतावासा मार्फत कारंजात येवून धडकली होती.त्यामुळे ही दुदैवी वार्ता ऐकून संपूर्ण कारंजा शहर दुःखसागरात बुडाले होते. त्याचे प्रेत एवढ्या लांबून आणावे कसे ? हा प्रश्न कुटुंबीयां समोर उभा होता. परंतु अखेर राज्य शासन आणि भारत सरकारच्या दुतावासामुळे अशक्य गोष्ट साध्य होऊन त्याचे प्रेत कारंजात आणण्यात येवून कुटूंबीयाचे सांत्वन करणयात आले.