ब्रम्हपुरी - दोन ते अडीच वर्षांपासून संपूर्ण देश कोरोना सारख्या महामारीचा सामना करत आहे. या संकटात डॉक्टर्स, नर्स, वार्डबाय, पोलीस, सफाई कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी असे सर्व जण जीवाची बाजी लावत कोरोनाशी दोन हात करत आहेत. कोरोना योद्धे म्हणून त्यांचं सर्वत्र कौतुक झालं आहे. मात्र त्याचवेळी आरोग्य क्षेत्रातील एक घटकही कोरोना काळात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मात्र, तरीही हा कमालीचा दुर्लक्षित राहिला आहे. ना त्याच्या कामाची कोणी योग्य दखल घेतली, ना त्यांना कोरोना योद्धा म्हणून संबोधिले गेले. कारोना काळात महत्त्वाची सर्व औषधांची तसेच कोरोणा लाशीची निर्मिती करण्यापासून ते औषध दुकानात येणाऱ्यांना औषधे देत रुग्णांचे समुपदेशन करण्यापर्यंत महत्त्वाचे काम हा घटक करत आहे. तो म्हणजे औषधनिर्माता.
या औषध निर्मात्याचे आभार व्यक्त करण्याकरिता बेटाळा फार्मसी महाविद्यालयाने २५ सप्टेंबर रोजी ब्रम्हपुरी शहरामध्ये जनजागृती रॅली काढत जागतिक औषधनिर्माता दिवस उत्साहात साजरा केला. महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी छत्रपती शिवाजी महाराज चौक ब्रम्हपुरी येथे सकाळी इंटरनॅशनल फार्मास्युटिकल फेडरेशन नी दिलेल्या लोगोची सुरेख अशी रांगोळी काढली. सर्व विद्यार्थ्यांनी व कर्मचाऱ्यांनी औषध निर्मात्याची शपथ ग्रहण केली. त्या नंतर ब्रम्हपुरी शहरातून भव्य अशी जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅली दरम्यान महाविद्यालयाने तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शहरातील सर्व औषध दुकानातील नोंदणीकृत औषध निर्मात्यांना मानचिन्ह तसेच गुलाब पुष्प देत त्यांचे स्वागत केले व शुभेच्छा दिल्या. रलीतून लोकांमधे जनजागृतीसाठी चौका- चौकात औषधांचे दुष्परिणाम, तसेच औषधांचे महत्त्व, फार्मसिस्ट चे समाजातील महत्त्व या विषयावर लोकांचे समुपदेशन करण्यात आले. प्राचार्य सचिन दुधे, प्राचार्य विशाल लोखंडे यांनी विद्यार्थ्यांना फार्मसिस्ट चे समाजातील योगदान कसे असेल पाहिजे यावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास पॉलिटेक्निक ब्रम्हपुरी महाविद्यालयाचे प्राचार्य सुयोगकुमर बळबुद्धे, प्रा. महाजन , प्रा. बरसागडे, प्रा. गिरडकर व सर्व शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.