कारंजा (लाड) : श्री दत्त जयंती निमित्त कारंजा लाड येथे श्री स्वामी समर्थ केंद्र जागृती नगर मध्ये सात दिवसीय उत्सवात दि 25 व 26 डिसेंबर दोन दिवस निशुल्क नाडी परीक्षण करून मर्मथेरपी ने पेशंट वर उपचार केले . श्री गुरुचरित्र पारायण चा केंद्रामध्ये दरवर्षी सप्ताह असतो आणि दरवर्षी डॉ अर्चना कदम येथे आरोग्य तपासणी शिबिर घेतात यावर्षी नाडी परीक्षण व मर्म थेरपी करून आयुर्वेदिक औषधांचा प्रचार व प्रसार केला .
डॉअर्चना कदम ह्या योग नॅचरोपॅथी ,कर्णबिंदू चिकित्सक ,नाडी परीक्षक व मर्म चिकित्सा यामध्ये चिकित्सक आहेत. आणि महिला पतंजली योग समितीच्या त्या वाशिम जिल्हाध्यक्ष आहेत
स्वामी समर्थ केंद्रातील नियोजन समितीने कार्यक्रमाचे नियोजन केले होते.यामध्ये अनेक महिला व पुरुषांनी याचा लाभ घेतला .