कारंजा (लाड) : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची कारंजा (लाड) येथील पाणीपुरवठा योजना सर्वस्वी पिंप्री फॉरेस्ट येथील अडाण धरणाच्या जलाशयावर अवलंबून आहे. मंगरूळपिर कारंजा तालुक्यातून वहात जाणाऱ्या अडाण नदीवरचे धरणही कारंजा तालुक्यातच आहे.मात्र ह्या धरणावर नियंत्रण यवतमाळ जिल्हा पाटबंधारे विभागाचे असून,या धरणाचे पाणीही सिंचना करीता यवतमाळ जिल्ह्याला दिले जाते. शिवाय कारंजा प्रमाणेच दारव्हा शहराची सुद्धा पाणीपुरवठा योजना ही याच धरणावर अवलंबून आहे. परंतु ज्या वाशिम जिल्ह्यातील पावसामुळे ह्या धरणात जलसाठा केला जातो.व ज्या जिल्ह्यात हे धरण बांधल्या गेलेले आहे.त्या वाशिम जिल्ह्याचा आणि कारंजा तालुक्याचा या धरणाच्या जलसाठ्यावर पहिला अधिकार आहे.सध्या पर्यावरणाच्या असमतोलामुळे आणि अल निनो सारख्या दुष्काळामुळे भविष्यात प्रचंड जलटंचाई उद्भवून पाणीसंकटाला तोंड द्यावे लागणार आहे.त्यामुळे "पिण्याच्या पाण्याकरीता सर्वस्वी अडाण धरणावर अवलंबून असणाऱ्या,कारंजेकरांनी आजचं आपला हक्क दाखवला नाही तर उद्या अन्य जिल्ह्यातील लोकं तुम्हाला जगू देणार नाहीत.भविष्यात कारंजेकरांना प्यायला पाणी मिळणार नाही." म्हणून पुढील भविष्याची नांदी ओळखून आजच,सर्वपक्षिय कारंजेकरांनी अडाण धरण कारंजेकरांच्या पिण्याच्या पाण्याकरीता राखीव करून घेणे अत्यावश्यक असून,कारंजा-मानोरा विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार राजेंद्रजी पाटणी यांनी याप्रकरणी आजच हस्तक्षेप करून,वाशिम जिल्हाधिकारी यांचे मार्फत अडाण धरणाचे पाणी कारंजा पाणीपुरवठा योजनेकरीता राखीव करून घेण्याची मागणी कारंजा येथील महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी केली आहे.