कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) :- कारंजा-मानोरा विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत मतदार संघातील विकास कामांचे प्रस्ताव प्रशासकीय यंत्रणे मार्फत शासनास पाठविले होते. त्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई यांनी शासन निर्णय क्रमांक: सावियो-२०२३/प्रा.क्र.३६९.अजाक अन्वये शासन निर्णय पारीत केला असुन येथील लोकप्रतिनिधी आमदार राजेन्द्र पाटणी यांनी सुचविलेल्या कारंजा मानोरा तालुक्यातील विकास कामांकरिता ५ कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे.
राज्यातील नागरी व ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत सन २०२३-२४ या वर्षासाठी असलेल्या अर्थसंकल्पीत तरतुदीतून या शासन निर्णया सोबतच्या परिशिष्ट ”अ” (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना शासन निर्णय क्रमांक सावियो-२०२३/प्रा.क्र.३६९/अजाक) येथील नमुद कामांना व त्याकरिता लागणाऱ्या निधीला शासनाची मंजुरी देण्यात आली आहे.
आमदार राजेंद्र पाटणी यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या कामांची संख्या ५० असून कारंजा व मानोरा तालुक्यातील कामे या प्रमाणे आहे.
कारंजा तालुक्यातील इंझा येथे दलित समाजाकरिता सभामंडप बांधकाम करणे अंदाजित किंमत १० लक्ष रुपये, धानोरा ताथोड येथे दलित समाजाकरिता सभामंडप बांधकाम करणे अंदाजित किंमत १० लक्ष रुपये, वाई येथे पुरुषोत्तम मनवर ते आत्माराम मनवर घरपर्यंत पेव्हर ब्लॉक बसविणे अंदाजित किंमत १० लक्ष रुपये, वाई येथे तुळशीराम आकातराम मनवर ते विजय मनवर घर पर्यंत पेवर ब्लॉक बसविणे अंदाजित किंमत १० लक्ष रुपये, सोहोळ येथे मांगपुरात सिमेंट रस्ता बांधकाम करणे अंदाजित किंमत १० लक्ष रुपये, पोहा येथे देवराव गवई ते शंकर मसने पर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे अंदाजित किंमत १० लक्ष रुपये, वढवी येथे सागर इंगोले ते प्रल्हाद काकडे, शंकर पांडे ते बुद्ध विहार पर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे अंदाजित किंमत १० लक्ष रुपये, ब्राह्मणवाडा येथे संदीप वानखडे घरापासून ते मेन रोड पर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे अंदाजित किमंत १० लक्ष रुपये, कामठा येथे दलित वस्तीमध्ये सभागृह बांधकाम करणे अंदाजित किंमत १० लक्ष रुपये, उंबर्डा बाजार येथे दोन वस्तीमध्ये भवानी माता मंदिर ते मस्का माय पर्यंत रस्ता बांधकाम करणे अंदाजित किंमत १० लक्ष रुपये, उंबर्डा बाजार येथे भवानी माता मंदिर ते बौध्द विहार पर्यंत रस्ता बांधकाम करणे अंदाजित किंमत १० लक्ष रुपये, खेर्डा येथे दलित वस्ती मध्ये नाली बांधकाम करणे अंदाजित किंमत १० लक्ष रुपये, वालई येथे दलित वस्तीमध्ये सभागृह बांधकाम करणे अंदाजित किंमत १० लक्ष रुपये, भडशिवनी येथे दलीत वस्तीमध्ये बंदिस्त नाली बांधकाम करणे अंदाजित किंमत १० लक्ष रुपये, जानोरी येथे दलित वस्तीमध्ये सभागृह बांधकाम करणे अंदाजित किंमत १० लक्ष रुपये, मनभा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सौंदर्यीकरण करणे अंदाजीत किंमत १० लक्ष रुपये, विरगव्हान येथे शंकर तायडे घर ते जि.प.शाळेपर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे अंदाजित किंमत १० लक्ष रुपये, शिवन येथे दलित वस्तीमध्ये अण्णाभाऊ साठे सभामंडप बांधकाम करणे अंदाजित किंमत १० लक्ष रुपये, खानापूर येथे अमोल डोंगरे ते गौरव जामनिक घर पर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे अंदाजित किंमत १० लक्ष रुपये, बांबर्डा येथे दलित वस्तीमध्ये सभामंडप बांधकाम करणे अंदाजित किंमत १० लक्ष रुपये,
मानोरा तालुक्यातील शेंदुरजना येथे बौद्ध विहार डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सभामंडप बांधकाम करणे अंदाजित किंमत १० लक्ष रुपये, रुई गोस्ता येथे बौद्ध विहार डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सभामंडप बांधकाम करणे अंदाजित किंमत १० लक्ष रुपये, इंझोरी येथे त्रिरत्न बौद्ध विहार सभामंडप बांधकाम करणे अंदाजित किंमत १० लक्ष रुपये, उंबर्डा बाजार येथे बौद्ध विहार परिसरात सभामंडप बांधकाम करणे अंदाजित किंमत १० लक्ष रुपये, जामदरा कवठळ येथे बौद्ध विहार परिसरात सभामंडप बांधकाम करणे अंदाजित किंमत १० लक्ष रुपये, म्ह्सणी येथे बौद्ध समाजाकरिता सभामंडप बांधकाम करणे अंदाजित किंमत १० लक्ष रुपये, भोयणी येथे बौद्ध समाजाकरिता सभामंडप बांधकाम करणे अंदाजित किंमत १० लक्ष रुपये, पोहरादेवी येथे दलित वस्ती मध्ये सिमेंट रस्ता व दुतर्फा नाली बांधकाम करणे अंदाजित किंमत १० लक्ष रुपये, सावळी येथे दलीत वस्तीमध्ये संत रोहिदास महाराज सामाजिक सभागृहाला वाल कंपाउंड बांधकाम करणे अंदाजित किंमत १० लक्ष रुपये, भुली येथे दलित समाजाकरिता बौद्ध विहार बांधकाम करणे अंदाजित किंमत १० लक्ष रुपये, हातोली येथे दलित समाजाकरिता बौद्ध विहार बांधकाम करणे अंदाजित किंमत १० लक्ष रुपये, फुलउमरी येथे दलित समाजाकरिता बौद्ध विहार बांधकाम करणे अंदाजित किंमत १० लक्ष रुपये, कोलार येथे शिवराम सावळे यांच्या घराजवळील मातंग वस्तीमध्ये बांधकाम करणे अंदाजित किमंत १० लक्ष रुपये, गिरोली येथे अशोक कांबळे यांचे सभामंडप बांधकाम करणे अंदाजित किंमत १० लक्ष रुपये, साखरडोह येथे आत्माराम राजगुरू यांचे घराजवळ चर्मकार वस्तीमध्ये सभामंडप बांधकाम करणे अंदाजित किंमत १० लक्ष रुपये, देवठाणा येथे दलित वस्तीमध्ये सभामंडप बांधकाम करणे अंदाजित किंमत १० लक्ष रुपये, सोमठाना येथे दलित वस्तीमध्ये सभामंडप बांधकाम करणे अंदाजित किंमत १० लक्ष रुपये, गव्हा येथे बसस्टँड परिसरातील दलीत वस्तीमध्ये रस्ता व नाली बांधकाम करणे अंदाजित किंमत १० लक्ष रुपये, म्हसला येथे दलित वस्तीमध्ये सुरेश भीमराव थोरात ते भीमराव थोरात पर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे अंदाजित किंमत १० लक्ष रुपये, वापटी येथे ज्ञानेश्वर खडसे ते मनोहर तायडे दलित वस्तीमध्ये सिमेंट रस्ता बांधकाम करणे अंदाजित किमंत १० लक्ष रुपये, विळेगाव येथे दलित वस्तीमध्ये सभागृह दुरुस्ती करणे अंदाजित किंमत १० लक्ष रुपये, जनुना येथे दलित वस्तीमध्ये सभामंडप बांधकाम करणे अंदाजीत किंमत १० लक्ष रुपये, रोहना येथे दलित वस्तीमध्ये सभामंडप बांधकाम करणे अंदाजीत किंमत १० लक्ष रुपये, म्हसनी येथे शाळेपासून ते काशिनाथ वरघट घरपर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे अंदाजित किंमत १० लक्ष रुपये, म्हसनी येथे मुख्य रस्ता ते गजानन थोरात घरपर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे अंदाजित किंमत १० लक्ष रुपये, भिलडोंगर येथे भीमराव तुकाराम थोरात यांचे घराजवळ सभामंडप बांधकाम करणे अंदाजीत किंमत १० लक्ष रुपये, विठोली येथे अरविंद मात्रे घरापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या पर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे अंदाजित किंमत १० लक्ष रुपये, मेंद्रा येथे दलित वस्तीमध्ये सभामंडप बांधकाम करणे अंदाजीत किंमत १० लक्ष रुपये, माउली येथे दलित वस्तीमध्ये सभामंडप बांधकाम करणे अंदाजीत किंमत १० लक्ष रुपये, शेंदोना येथे दलित वस्तीमध्ये सभामंडप बांधकाम करणे अंदाजीत किंमत १० लक्ष रुपये.
उपरोक्त विकास कामांना आमदार राजेंद्र पाटणी यांच्या विशेष प्रयत्नाने मंजुरी मिळाली असल्याची माहिती संजय भेंडे भाजपा तालुका प्रसिद्धी प्रमुख तथा आमदार राजेंद्र पाटणी यांचे स्वीय सहाय्यक यांनी महाराष्ट्र राज्यस्तरीय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना दिली आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....