कारंजा : कारंजा येथून जवळच असलेल्या विदर्भ पंढरी इंझा [वनश्री ] येथील वैराग्यमुर्ती योगीराज सदगुरू संत श्री कैलासबाबा संस्थान येथील दत्त पोर्णिमेचा दत्त जयंती महोत्सव पंचक्रोशितच नव्हे तर संपूर्ण विदर्भात सुप्रसिद्ध असून, संत श्री कैलासबाबा यांचे हजारो अनुयायी अमरावती यवतमाळ जिल्ह्यासह विदर्भ झाडेपट्टी भागात आहेत. संत श्री कैलास बाबांजवळ अंधश्रध्देला थारा नाही. त्यांची शांत, सयंमी सुस्वभावी मुर्ती आपल्या अनुयांयाना भावून जाते. बाबांचे अनुभव अनेक भाविक भक्तांना वेळोवेळी येत असतात. अनेक भक्तांचे बाबांवरील श्रद्धा आणि विश्वासामुळे कल्याण झाले असून अनेक आजारग्रस्तांची असाध्य आजारा मधून सुटका झालेली आहे . संत श्री कैलास बाबा हे नाथ संप्रदायी असून कित्येकांना त्यांचेमध्ये साईबाबांचा प्रत्यय आलेला आहे . त्यामुळे हिंदु आणि मुस्लिम अशा सर्वधर्मियांची बाबां प्रती अतूट अशी भक्ती आहे. अशा संत श्री कैलास बाबांचे भाविक भक्त मंडळींनी इंझा वनश्री येथे खूप मोठे मंदिर बांधून दिले असून शक्यतोवर बाबा भुयारातच राहतात. बाबांच्या दरबारात महादेवाचे मंदिर, हनुमंताचे मंदिर, अंबाबाईचे मंदिर, दत्तात्रयाचे मंदिर असून मनमोहक मुर्ती आहेत.दर शनिवारी येथे भाविक मंडळींची मांदियाळी बघायला मिळते. येथे नवरात्रोत्सव, दत्त जयंती उत्सव, महाशिवरात्री उत्सव आणि हनुमान जयंती उत्सव दरवर्षी साजरे केले जातात . त्यापैकी दत्त जयंती उत्सव येणाऱ्या दि ६ डिसेंबर २०२२ रोजी इंझा वनश्री येथे साजरा केल्या जाणार असून, सतत तिन दिवस उत्सव साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त श्री गुरुचरित्राचे पारायण,किर्तन आणि दुसरे दिवशी इंझा [वनश्री] या गावामधून शेकडो भजनी मंडळाचे उपस्थितीत भव्य रथयात्रा, काल्याचे किर्तन व भव्य महाप्रसाद होणार असल्याची माहिती त्यांचे सेवाधारी भक्त पदमाकर महाराज यांचे कडून देण्यात आली असून दिपावली नंतर स्वतः सदगुरू संत कैलासबाबा हे श्री दत्तपोर्णिमा उत्सवा निमित्त आपले अनुयायी भाविक भक्त मंडळींकडे भ्रमंती करणार आहेत .तरी पंचक्रोशितील संत कैलास बाबाचे भाविक भक्त मंडळींनी दत्त जयंती उत्सवा करीता व त्यानिमित्त होणाऱ्या महाप्रसादाकरीता तन मन धनाने, तेल, दाळ, गहू व इतरही आवश्यक अन्नधान्यासह दक्षिणा रुपाने जास्तित जास्त सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच यात्रोत्सवा निमित्त लघु व्यावसायिकांनी आपआपली दुकाने येथे आणावीत. त्याच प्रमाणे रथयात्रेत जास्तित जास्त भजनी मंडळ, भजनी दिंड्यानी अगोदरच संत कैलास बाबांचे सेवाधारी भक्त पद्माकर महाराज यांच्या मो नं 9922519543 किंवा 8550935451 वर सहभाग नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आलेले आहे. असे वृत्त संत कैलास बाबांचे अनुयायी आणि वारकरी मंडळाचे संजय महाराज कडोळे आणि स्वयंसेवक दामोधर जोंधळेकर यांनी कळवीले आहे .