अकोला - जुने शहर डाबकी रोड सिद्धार्थ चौक श्रीवास्तव येथील 70-80 वर्ष जुने असलेले वडाचे झाड हे एका साईटला झुकलेले असून येथून विद्युत तार सुद्धा गेलेले आहेत. झाडाच्या फांद्या विद्युत तारांना स्पर्श झाल्यास आगीचे गोळे होतात. बाजूला स्ट्रीट लाईटचा पोल सुद्धा आहे याला सुद्धा वडाच्या झाडाचे व पिंपळाच्या फांद्यांनी पूर्णपणे झाकलेले असून तेथे सुद्धा विद्युत तार गेलेले आहेत या रोडनी बरेच प्रमाणात नागरिक वाहन चालवीत ये-जा करतात व शालेय विद्यार्थी कॉन्व्हेंटचे लहान मुले सुद्धा ये जा करतात या झाडांचे एकीकडे झुकलेल्या फांद्या विद्युत तारावर झुकलेल्या आहेत फांद्याची कटाई न केल्यास कोणत्या क्षणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी महानगरपालिका प्रशासन व महावितरण कंपनी यांनी जातीने लक्ष देऊन अपघात न व्हावा यासाठी महानगरपालिका प्रशासन व महावितरण कंपनी यांनी वडाच्या झाडाच्या व पिंपळाच्या झाडाच्या फांद्या छाटून अपघात टाळावा अशी जुने शहर डाबकी रोड येथील नागरिकांची मागणी आहे.