विकसित भारतासाठी विज्ञान एक वरदान ठरत असून भारताच्या सर्वांगीण विकासासाठी युवकांनी विज्ञान समजून घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मोहसीन भाई जव्हेरी महाविद्यालय देसाईगंज वडसा येथील प्राचार्य डॉ आशिष सेलोकर यांनी केले ते आज स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय आरमोरी येथे मराठी विज्ञान परिषद आरमोरी द्वारा आयोजित राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. के. टी. किरणापुरे उपस्थित होते तर प्रमुख वक्ते प्राचार्य डॉ.आशिष सेलोकर तर प्रमुख अतिथी म्हणून सतीश धाईत व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी डॉ. के. टी किरणापूरे यांनी डॉ. सी .व्ही रमण यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्त्व पटवून दिले.
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त घेण्यात आलेल्या निसर्ग संवर्धन पोस्टर स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करणारी विद्यार्थिनी कुमारी पायल विनोद बेहरे, द्वितीय क्रमांक प्राप्त तनुज युवराज मने व तृतीय क्रमांक कुमारी, गायत्री प्रफुल आखाडे तर प्रोत्साहनपर बक्षीस कुमारी,वंदना जीवन मानकर या विजेत्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक हरेश बावणकर यांनी केले तर आभार शुभांगी बेंदरे यांनी केले.
यावेळी मोठ्या संख्येत विज्ञान प्रेमी विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.