नागभिड- ब्रम्हपूरी रोडवरील तुबंडीमेंढा गावाजवळ दि.28 जुन ला पाच वाजताचे दरम्यान वाघाने हल्ला करून एका इसमाला ठार केल्याची घटना उजेडात आली असुन वाघाचे हल्यात ठार झालेला इसम भगवानपूर येथिल ताराचंद चंदनखेडे वय 55 वर्ष आहे.सध्या या परिसरात शेतीचे कामे सुरू आहेत. शेतीची नागरडी करणे सुरू होते. दरम्यान ट्राँक्टर ला डिझेल आनण्यासाठी शेतशिवारातुन ब्रम्हपूरी ला जातो म्हणून सदर इसम स्वताचे दुचाकी वाहन
क्र.एम.एच.३४,बि.एम.८६१४ ने जाण्यासाठी निघाला असता दबा धरून बहलेल्या वाघाने त्याचेवर हल्ला केला व त्याला फरकळत जगंलात नेवून संपुर्ण खावून टाकले. मात्र वाघाने ठार केले ही गोष्ट उशिरा शोधमोहिमेनतंर कळली आणी सर्वत्र शोककळा पसरली मृत्तक इसम हा चोरटी येथिल सेवा सहकारी सोसायटीचा उपाध्यक्ष होता. वरदळीचे ठिकान असलेल्या नागभिड-ब्रम्हपूरी रोडलगत असलेल्या तुबंडीमेंढा गावाजवळील पोद्दार स्कुल जवळ ही घटना घडल्याने या परिसरात भितिचे वातावरण पसरले आहे.