चंद्रपूर : ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुराने शेतातील उभे पीक खरडून गेले. त्यामुळे वैफल्यग्रस्त जीवन जगत असलेल्या एका 58 वर्षीय शेतकऱ्याने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज शनिवारी (3 सप्टेंबर) ला चिमूर तालुक्यातील पिंपळनेरीपेठ शेतशिवारात घडली. विजय दादाजी रोकडे (58) वर्ष असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
ऑगस्ट महिन्यात चिमूर तालुक्यात मुसळधार पाऊस पडला. तउमा नदीसह छोटे मोठे नाले कुटुंब भरून वाहू लागली. नदी नाल्यांच्या परिसरात महापुर आला. त्यामुळे शेतात लागवड करण्यात आलेले उभे पिक मोठ्या प्रमाणात नष्ट झाले. तालुक्यातील पिंपळनेरी पेठ येथील शेतकरी विजय दादाजी रोकडे यांची स्वतःची 6 एकर शेतजमीन आहे. तसेच गावातील काही लोकांची शेतजमीन ठेक्याने करतात. यावेळी त्यांनी स्वतः व खेकड्याच्या शेतात धान, कापूस व सोयाबीन पिकाची लागवड केली होती, परंतु त्यांचे शेतजमीन नाल्यालगत असल्याने महापुराने संपूर्ण पीक उध्वस्त झाले. मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाल्याने शासनाने नुकसान भरपाई घोषित केली. नुकसानीचे पंचनामे झाले, परंतु शेतकऱ्यांच्या पदरात अद्याप मदत पडलेली नाही. रोकडे यांचे नुकसान झाले तेव्हापासून ते चिंताग्रस्त जीवन जगत होते. आज शनिवारी त्यांनी शेतातील पीक नष्ट झाल्याच्या कारणाने स्वतः गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा बराच मोठा परिवार आहे. यावेळी महापुरामुळे शेतातील नष्ट झाले तर दरवर्षी कोणते न कोणते संकट शेतकऱ्यावर येत असल्याने उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट झाली आहे. रोकडे यांच्या उत्पादनात ही घट झाल्याने त्यांना दरवर्षीच नुकसान सहन करावे लागत होते. त्यामुळे शेती कसण्यासाठी देण्यात आलेले कर्ज, हात उसने घेतलेले पैसे चुकते करण्यास या शेतकऱ्याला अडचणीचे ठरत होते. त्यामुळे त्या शेतकऱ्याने जिवनयात्रा संपविली.
Chandrapur: The flood that occurred in the month of August wiped out the standing crops in the fields. A 58-year-old farmer who was living a frustrated life committed suicide by hanging himself today Saturday (September 3) at Pimpalneripeth Shetshiwar in Chimur taluka. The name of the deceased farmer is Vijay Dadaji Rokade (58).
In the month of August, there was heavy rain in Chimur taluka. Small and big streams including the Tauma River began to flood the family. There was a flood in the area of the river channels. Due to this, the standing crops planted in the fields were largely destroyed. Vijay Dadaji Rokde, a farmer from Pimpalneri Peth in the taluka, owns 6 acres of agricultural land. Also some people in the village do the farming on contract. At this time, he had cultivated paddy, cotton and soybean crops in his own and crab farm, but as his farm land was next to a drain, the entire crop was destroyed by the flood. The government announced compensation due to the massive loss of crops. The loss has been assessed, but the farmers have not been helped yet. Ever since the loss of Rokade, he has been living a life of anxiety. On Saturday, he hanged himself due to the destruction of the crops in the field. He is survived by his wife, two sons and a daughter. At this time, if the farm is destroyed due to flood, every year some crisis comes to the farmer, so the production has decreased to a great extent. Due to this decrease in the production of Rokade, they had to bear losses every year. Therefore, it was difficult for this farmer to repay the loan given for farming, the money borrowed. So that farmer ended his journey.
आपल्या प्रतिक्रिया द्या....