कारंजा(लाड) :-तालुक्यातील काकडशिवणी येथील राजू आत्माराम लळे वय वर्षे ५० हे शेतकरी
बुधवार दि. ०७/०५/ २०२५ रोजी संध्याकाळी ०७ ते ०७:३० च्या दरम्यान शेतात गेले असतांना अचानक रोही ह्या वन्यप्राण्याने त्यांचेवर हल्ला केला.या हल्ल्यात शेतकरी लळे हे गंभीर जखमी झाले. पुढील उपचारासाठी त्यांना अकोला रुग्नालयात अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यु झाला.त्यांच्या पश्चात 3 अविवाहीत मुली व पत्नी असा मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या जाण्याने संपूर्ण काकडशिवणी गावावर शोककळा पसरली असून, परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.असे वृत्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष संजय कडोळे यांना प्रतिनिधी विजय खंडार यांनी कळवीले आहे.