सिरोंचा* :- तालुक्यात आलेल्या पुराच्या पाणी मुळे ब-याच शेतकरी तसेच भाङयाने शेती घेतलेल्या शेतमजुरांचा आतोनात नुकसान झाला आणि कापुस पेरलेल्या शेतक-याचे नुकसान झाले सध्या दुस-या काही शेतकरी लोकांना तिस-या वेळी पेरणी करण्याची पाळी आली आहे सिरोंचा तालुक्यात कित्येक भुमीहीन शेतमजुर भाङयाने शेती घेवुन धान आणि कापूस पेरणी केली होती या शेतमजुरांना पुन्हा पेरणी करण्याची पाळी आली आहे भाङयाचे पैसे पहिलेच द्यावे लागते आणि पुन्हा पेरणी खर्च या मुळे भाङयाने शेती करणारा शेतमजूर दुहेरी संकटात सापङलेले आहे भाङयाने शेती करणा-या भुमिहीन शेतमजुराला काही ही शासनाकङून मोबदला नुकसान भरपाई च्या रूपाने मिळणार नाही काही मोबदला मिळल्यास ते थेट सात -बारा ज्याच्या नावावर आहे त्यानाच मिळणार तीच शेतीची जमिन भाङयाने घेतलेला शेतमजुराचे नुकसान झाले आणि जमीन मालकाचे काही ही नुकसान झाले नाही परत त्याला मोबदला मिळणार आहे ही परिस्थिती अत्यंत गंभीर स्वरूपाची सध्या आहे एकरी 8000 हजार ते दहा हजार पर्यंत भाङयाने घेवुन धान आणि कापूस मिळवतात.