कारंजा लाड : जागतिक महिला दिनानिमित्त (महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व समस्त तेली समाज बहुउद्देशीय महिला संघटनेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त रविवार दि.९ मार्च २०२५ रोजी स्थानिक कारंजा नागरी सहकारी पत संस्थेच्या सभागृहामध्ये विविध क्षेत्रातील "कर्तबगार महिला" सत्काराचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून व सावित्रीबाई फुले तसेच श्री.संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या प्रदेशाध्यक्षांकडून सर्व शाखांना निर्देश देण्यात आले होते की, "महाराष्ट्रातील पत्रकार संघाच्या विविध शाखेमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त महिला दिन साजरा करण्यात यावा." त्यानिमित्ताने निलेश सोमानी प्रदेश कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई,यांच्या मार्गदर्शनात कारंजा (लाड) येथील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेच्या सर्व शाखेच्या वतीने दिनांक ९ मार्च २०२५ रोजी तालुक्यातील विविध सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तबगार महिलांचा सत्कार घेण्यात आला.त्यामध्ये प्रामुख्याने डॉ. सोनाली सचिन बनारसे,श्रीमती प्रमिलाताई जीरापुरे,कु.स्वराली नितीन वाणी,सौ.स्वाती गोपाल कडू, सौ.माधुरी क्षार, सौ.अर्चनाताई गुल्हाने या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कतृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला.यावेळी सुनील फुलारी विभागीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ ; अभय खेडकर विदर्भ कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ ; संजय कडोळे विदर्भ उपाध्यक्ष ; किरण क्षार जिल्हाध्यक्ष ; दिलीप रोकडे विभागीय उपाध्यक्ष ; मोहम्मद मुन्नी वाले तालुकाध्यक्ष ; प्रफुल बानगावकर जिल्हाध्यक्ष पत्रकार विरोधी हल्ला कृती समिती ; नितीन वाणी शहराध्यक्ष महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ कारंजा ; विलास राऊत,शेकूवाले सर,एकनाथ पवार,योगेश यादव, उमेश अनासाने,प्रदीप वानखडे, गोपाल कडू,हाफीज खान,जिनवर तायडे,अमोल अघम उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक विदर्भ उपाध्यक्ष संजय कडोळे यांनी सूत्रसंचालन गोपाल कडू यांनी केली तर कार्यक्रमाचे आभार मोहम्मद मुन्नीवाले यांनी व्यक्त केले.