अकोला :-
नामाची ज्योत आपल्या अंतःकरणात सतत ठेवत ठेवा
आपण म्हणजे त्यातल्याच बऱ्याच व्यक्ती ह्या काय करीत असतात जेव्हा-जेव्हा त्यांना कधी-कधी अडचणी , समस्या आल्या तेव्हाच त्यांना फक्त आपला भगवंत , देवबाप्पा , ईश्वर , परमात्मा , परब्रम्ह आठवीत असतो
पण मात्र ते जेव्हा कायमच सुखी-समाधानी , आनंदी-आनंदात किंवा कोणत्याही समस्या मधून निश्चिन्त असतात तर तेव्हा त्यांना देवाची आठवण अजिबातच होत नसते
म्हणजे खरेच पहायला गेलो तर आपण सर्वच जे काय ह्या ठिकाणी रहात आहोत तर त्या
देवाचीच तर कृपा-आशीर्वादानेच तर रहात आहोत आपण मात्र बहुदा बरेच लोक हेच विसरतो आहोत
म्हणजे काय तर त्याच
भगवंतालाच आपण विसरतो आहोत कारण आपण त्या आपल्याच ईश्वराचे , भगवंताचे जास्तच स्मरणच करीत नाहीत
आणि जेव्हा आपल्याला काहीतरी कठीण प्रसंग , समस्या , अडचणी ह्या निर्माण झाल्यावरच फक्त आपण त्या देवाला स्मरण करुन विनंती करीत असतो
पण मात्र हे जे काय आपण करीत आहोत ते तर फारच
चुकीचे आहे कारण आपण तर आपल्या देवतांना रोजच स्मरण करायलाच पाहिजे आणि ते म्हणजे नामाची ज्योत आपल्या अंतःकरणात सतत तेवत ठेवायला हवी "
आपण ज्या देवतांच्या कृपेने ह्या धरतीवर वास्तव्य करीत आहोत व ज्यांनीच ही सृष्टी रचना केलेली आहे तर त्यांनाच आपण आपल्या अंतःकरणात पूजन करुन स्मरण करून सतत ज्योत रूपाने नाम हे कायमच आपल्या मनातून आणि अंतःकरणातून घेऊ शकत असतो
कारण ह्या नामाचा आणि त्याच नामाच्या पूजनाचा महिमा आपण ,जितका वर्णन करू तितकाच तो कमीच आहे म्हणजेच काय तर नामस्मरणाचा महिमा आहेच तसा ,जो कोणीही या नामाची
(आप-आपल्या इष्ट देवतांचे नाम )गोडी चाखेल तर त्यांनाच याबद्दल जास्तच महत्व हे समजेल
म्हणजे आपले " ऋषि-मुनी , साधू-संत , गुरु-धर्मगुरु आणि उच्चकोटीतील गुरूंच्या सेवेतून मार्गदर्शन लाभलेले विशिष्ट साधक असतात तर यांनाच माहिती असतो नामाचा महिमा आणि नामाची गोडी "
पण मात्र आपण सर्वसामान्य लोकांनी देखील त्या आपल्याच भगवंताला तर आपण देखील स्मरण करू शकत असतोच " म्हणजे काय तर आपण संसार सांभाळून परमार्थ हा करू शकतच असतोच "
म्हणजे आपण सर्वच लोक हे " आप-आपल्याच कौटुंबिक जबाबदाऱ्या सर्वच पार पाडून आणि म्हणजे काय तर संसार-प्रपंच सांभाळून परमार्थ हा करू शकत असतोच "
कारण " नाम-नामस्मरण आणि नामस्मरण साधना ही अशीच एक सोप्यात सोपीच आपल्या ईश्वराला प्राप्त करण्याची सेवा आहे " म्हणजेच काय तर " आपण नामस्मरण हे केव्हाही करू शकत असतो"
म्हणजे काय तर आपण
"आपल्याच इष्ट देवतांचे नाम हे केव्हाही आणि कधीही घेऊ शकत असतोच " म्हणजे ते
" नाम आपण मनातून- अंतरमनातून घेऊ शकतच असतो "
कारण " नामसाधना " या सारखीच दुसरी अशीच कोणतीही सोपी साधना नाही आहे हे मात्र आपण सर्वानीच लक्षात ठेवायलाच हवे म्हणजे
नाम आपण अशाच प्रकारे घ्यायला पाहिजे आपल्या प्रत्येक श्वासावर आपण नामस्मरण हे करायला पाहिजे
म्हणजे हे असेच जे कोणीही
चांगल्याच उच्चकोटीतील गुरूंच्या सानिध्यात राहून आपला भक्तीभाव जागृत ठेवत असतो , कारण अशा साधकांना ही प्रत्येक श्वासावर नाम जपायची सवयच झालेली असते , म्हणजेच ते त्यांच्या जीवनातील प्रत्येक श्वास आणि त्याच श्वासावर आपण कसे नामस्मरण करायला पाहिजे हे रहस्य जाणलेले असते
पण मात्र आपल्या सारख्याच सर्वसामान्य लोकांनी आपल्या इष्ट देवतांना तर आपण निदान आपल्या मनातून-अंतःकरणातून तर मात्र पूजन स्मरण करू शकत तर असतोच ना
ज्या-ज्या भक्तांना- साधकांना नामाचे महत्व समजेल तर त्यांना त्यांच्या जीवनात कोणतीही समस्या , दुःख आले तरीही त्यांचा काही विशेष असा परिणाम हा नामसाधना , नामजप करणाऱ्या भक्तांना होणारच नाही
म्हणजेच काय तर आपण सर्वानीच आपल्या हृदयात आपल्या अंतःकरणात नामाची ज्योत ही सतत तेवत ठेवायला पाहिजे
श्री राम जय राम जय जय राम सौ. छाया राजेंद्र पाटील
धुळे , महाराष्ट्र
86526 95999
आपल्या प्रतिक्रिया द्या....