कारंजा : समाजात आधीच मुलींचे प्रमाण,मुलांच्या सरासरी पेक्षा बरेच कमी आहे.आणि त्यामुळे आज प्रत्येक समाजातून मुलांच्या विवाहाकरीता मुलींची मागणी होत असून बऱ्याच उपवर विवाहोच्छुक मुलांचे विवाह मुलीच मिळत नसल्याने रखडलेले आहेत.अनेक मुलांनी वयाची पस्तीशी ओलांडून चाळीशीच्या उंबरठ्यावर पोहोचले.तरीही त्यांचे विवाह होत नाहीत.हे समाजातील वास्तव असतांना,दुसरीकडे मात्र,आज जर वर्तमानपत्र उघडले तर कोठेना कोठे एखादी तरुण मुलगी हरविल्याची तक्रार हमखास मिळते,कोठे मुलगी अचानक अदृश्य झाल्याची तर,कोठे एखाद्या परधर्मिय मुला सोबतच पळून गेल्याची तक्रार असते.केव्हा केव्हा तर परधर्मिय मुलासोबत विवाहबद्ध झाल्यानंतर त्याचेकडून हरविल्याची तक्रार असते तर कोठे त्या मुलीचा बलात्कार करून खून किंवा हत्या झाल्याची खबर मिळते.कोठे मुलीनेच स्वतःची फसवणूक व छळ झाल्याने आत्महत्या झाल्याची सुद्धा बातमी असते.मात्र हे सर्व का घडत आहे ? याला कारणीभूत कोण आहे ? याचा केव्हा आपण विचार केलाय का ? मुलीला जन्म देणारे आईवडिल लाडक्या मुलींना फुलाप्रमाणे जपत असतांना,जावायाबाबत ऐपती पेक्षा जास्त अपेक्षा बाळगतात.स्वतः रोजमजुरीने हातावर कमविणारे व्यक्ती सुद्धा आज आपल्या लेकीबाळींना, सरकारी नोकरी करणाराच नवरा मिळावा.माझी मुलगी आतापर्यंत खेड्यात जन्मली व वाढली.पण
यापुढे तिला खेड्यातील मुलाला द्यायचे नाही.आमची मुलगी जास्त शिकलेली,लाडाकौतुकात वाढलेली असल्यामुळे शेतात जाणार नाही.घरकाम करणार नाही.अशी वाजवीपेक्षा जास्त निरनिराळी बंधने टाकत असतात.आणि त्यामुळे बरेच ठिकाणी उपवर मुली होऊनही त्यांचे विवाह रखडलेले असतात.या अशा विपरीत परिस्थितीमुळे उपवर झालेल्या मुलींवर सुध्दा बाहेरील परिस्थितिचा,चित्रपट, दूरचित्रवाहिन्यावरील मालिकाचा आणि भ्रमणध्वनी वरील समाजमाध्यमाचा,कोठेतरी विचित्र व वाईट परिणाम होऊन,आपले आईवडिल आपले लग्न जुळवून देत नाहीत.अशी नैराश्याची भावना होऊन आपणच प्रेमविवाह करावा.अशी त्यांची मानसिकता तयार होऊ शकते.अशातच मग त्या मुलीवर एखादा मुलगा प्रेमाची मुकपणे उधळण करतो.आपला प्रभाव पाडण्या करीता,त्या मुलीचा शॉपींगचा,हॉटेलिंगचा खर्च करतो.मौलिक भेटवस्तूचा तिचेवर वर्षाव करतो,तीचेकरीता भरपूर वेळ देऊन,आपल्या गोडी गुलाबी लाडीक बोलण्याने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात पूर्णपणे अडकवून घेऊन,मग घरचे लग्नाला तयार होणार नाहीत.त्यापेक्षा पळून जाऊनच लग्न करू.व आपला राजाराणीचा संसार थाटू.असे तिला आमिष दाखवून दोघेही "सैराट" पळून जातात. व नंतर मात्र निराधार होऊन ती मुलीचे प्रचंड हाल होतात. तीची फसवणूक होते हत्या होते किंवा ती आत्महत्या करते.व आईवडील मात्र मुलीच्या या असल्या प्रतापाने अर्धमेले होऊन पश्चाताप करीत बसतात.आणि अशी वेळच जर मुलीचे आईचे वडील यांना बघायची नसेल.तर मग प्रत्येक आईवडिलांनी मुलीचे फाजील लाड करीत बसण्यापेक्षा आणि जावाई मुलाबाबत नको त्या अपेक्षा ठेवण्यापेक्षा,गरीब असला तरीही चालेल पण होतकरू-मेहनती-सज्जन मुलगा शोधून वयातच मुलीचे लग्न करून देणे अपेक्षित असते. आईवडील मुलींना जन्म देतात.मुलगी असली तरी तिला मुलापेक्षा जास्तच प्रेम करतात.माया लावतात.त्यांना हवे तसे शिक्षण देण्याकरीता धडपडतात.त्यांचे लालनपालन करतांना,मुलींचे हवे ते लाड पुरवितात.परंतु हे सर्व उपकार विसरून,मुलींचे घरातून,शाळा महाविद्यालयातून,आपल्या गावातून अदृश्य होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून,अनेकवेळा काही मुलींचा अनैसर्गीक मृत्यु किंवा हत्या झाल्याचा समाचार मिळतो.तर काही वेळा अज्ञान मुलिंनी आंतरजातिय विवाह केल्याचे वृत्त मिळते.तर काही वेळा मुलींना परत आणण्याचा प्रयत्न जरी आईवडिल आणि पोलिस विभागाने केला तरी सुद्धा ह्या मुली संमोहित झाल्याप्रमाणे, "त्यांनी जे काही केलं.ते प्रेम केलं आता आईवडिलांकडे जायचे नाही." आम्ही केलंय तिचं पूर्वदिशा असल्याचे जवाब देऊन, त्यांचेवर प्रेमाच भुतं असल्याच दर्शवीत,प्रत्यक्ष जन्मदात्या आईवडिलांसोबतचे ऋणानुबंध तोडायलाही मागेपुढे पहात नाहीत.मात्र आईवडिलांना दुखवून,सामाजिक विद्रोह करून ह्या मुली भविष्यात केव्हाच सुखी राहू शकत नाहीत.एकदा का जीवापाड प्रेम करणाऱ्या आई वडिलांच्या निःस्वार्थ मायाममता प्रेमाची प्रतारणा करून ह्या मुली आईवडिलांना दुखवून निघून गेल्यात.तर भविष्यात यांच्या सुखदुःखात आईवडिलांचा आधार,त्यांची छत्र छाया त्यांना मिळूच शकत नाही.त्यामुळे भविष्यात त्यांचे आयुष्य संपूर्ण जीवन त्यांनी एकाकीपणानेच जगावे लागते.हे कटूसत्य आहे.ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे.वास्तविक यामध्ये दोष मुलींचा आहे.असे मला म्हणायचेच नाही ? तर दोष असतो त्यांना फुस लावणाऱ्या मुलांचा.आणि असी फुस लावणारी मुलं संस्कारी असूच शकत नाहीत. त्यामुळे मुलींनी आई वडिलांच्या मर्जीविरुद्ध जाऊन इतर मुलांच्या किंवा मुलांनी सुध्दा इतर मुलीच्या फुसलावण्याला बळी पडूच नये.आपल्या भारतिय संस्कृती आणि संस्कारामध्ये विवाह संस्थेला अनन्य साधारण असे महत्व आहे.व त्यातही येथे मुलाच्या किंवा मुलीच्या आईवडिलांनी जुळवून दिलेले विवाह ग्राह्य मानल्या जात असतात. आज चित्रपट,दूरदर्शन वाहिन्यांवरील मालिका आणि त्यांच्या हातातील मोबाईल. फेसबुक,इन्स्टाग्रॉम,व्हॉटसपचा वापर,या इलेक्ट्रॉनिक्स समाजमाध्यमाच्या निरर्थक वापरामुळेच मुलींचे अदृश्य होण्याचे प्रमाण वाढले आहे.असे म्हटले तर वावगं ठरणार नाही.त्यामुळे प्रत्येक आई वडीलांनी व कुटूंब प्रमुखाने आपल्या मुलामुलीच्या भ्रमणध्वनीच्या (मोबाईलच्या) वापरावर लक्ष्य केन्द्रित केलं पाहीजे.त्यांच्या मोबाईल मध्ये किती सिमकार्ड आहेत ? त्यामध्ये किती बॅलन्स असतं ? आपली मुलंमुली यांच्या मोबाईलची संपर्क यादी,त्यांचे मित्र मैत्रीणी कोण कोणते ? ते मोबाईलचा वापर कशाप्रकारे करतात ? व्हॉटस एप,फेसबुक,इन्स्ट्राग्राम,ट्विटर वर किती वेळ रहातात ? कोणते चित्रपट,मालिका पहातात ? याकडे जर लक्ष्य दिले तर निश्चितच मुलामुलीचे अदृश्य होण्याचे आणि मनमानी करीत घरातून पळून जाण्याचे आणि दुसऱ्या मुलामुलीच्या बंधनात अडकण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.केव्हाही टाळी एका हाताने वाजत नाही.त्यामुळे मुलामुलींना प्रेमाने माया ममतेने विश्वासात घेऊन त्यांचेवर चांगले संस्कार घडविल्या गेले.तर कोणत्याच प्रकारच्या अनर्थ घटना निश्चितच होणार नाही.व मुलामुलींचे अदृश्य होण्याचे,पळून जाण्याचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी होईल.नव्हे नव्हे अशा घटनाच घडणार नाहीत. तसेच आजच्या मुलींनी सुद्धा जन्मदाते जो काही निर्णय घेतात तो मुलींच्या उज्वल भविष्याकरीताच असतो. जन्मदाते केव्हाच मुलींचे नुकसान होऊ देणार नाहीत हे सत्य लक्षात घेऊन आईवडिलांच्या विश्वासाला तडा जाईल. समाजात तुमची व आईवडिलाची इज्जत सदैव कायम रहावी हे लक्षात ठेवावे व जन्मदात्या आईवडिलांच्या निःस्वार्थ प्रेमाची प्रतारणा करू नये.असे समाजप्रबोधनकार ,विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष,महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त संजय कडोळे यांनी म्हटले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....