कारंजा (लाड) : बदलापूर व इतरत्रही देशात आणि राज्यात छोट्या चिमुरड्या मुलींवर आणि महिलावर हेणाऱ्या अन्याय व अत्याचाराचे प्रमाण वाढले असल्याने, लहान चिमुरड्या बालिका-महिलांना शासनाकडून सुरक्षा व संरक्षण मिळावे.आणि सुरक्षित जीवन जगण्याची हमी मिळावी.याकरीता स्त्री शक्ती मंचाच्या पदाधिकारी महिला मंडळींनी,नुकत्याच राज्यात घडलेल्या वाईट कृत्याचा निषेध करीत माननिय तहसिलदार कुणालजी झाल्टे कारंजा यांचे मार्फत शासनाला निवेदन दिले आहे.निवेदनामध्ये त्यांनी शासनाने बालिका व महिलांना सुरक्षा द्यावी. चिमुकल्या मुलीवर व स्त्रीयावर होणाऱ्या अत्याचाराबद्दल कठोरात कठोर कायदे करून दोषीवर कारवाई करण्याकरीता मृत्युदंड म्हणून फाशीची तरतूद करावी.अशी मागणी केली.सदर मागणीचे निवेदन स्त्री शक्ती मंच संघटनेच्या अध्यक्षा सौ.शारदा अतुल भुयार व महिला मंडळींनी तहसिलदार कुणालजी झाल्टे सर यांचे मार्फत,महामहिम राष्ट्रपति, माननिय प्रधानमंत्री,माननिय मुख्यमत्री,माननिय गृहमंत्री, माननिय महिला व बालकल्याण मंत्री यांना दिल्याचे कळवीले आहे.