कारंजा (लाड) : उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडून कारंजा तालुक्यातील 23 जणांचे मोबाईल गहाळ झाल्याच्या तक्रारीवरून सी. ई. आय. आर. पोर्टल वरून शोध घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी जगदिश पांडे यांच्या हस्ते तक्रारदारास दि. 17 जानेवारी रोजी परत करण्यात आले. परत करण्यात आलेल्या 23 मोबाईलची किंमत अंदाजे दोन लाख तिस हजार रुपयांच्या जवळपास होती. या संदर्भात मोबाईल हरवलेल्या नागरिकांनी पोलिसात तक्रार दिली त्यावरून CEIR पोर्टलच्या माध्यमातून मोबाईलचा शोध घेण्यात आला. या कार्यावाही मध्ये सायबर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भुशन गावंडे,पो.काॅ.विजय गंगावणे पो.काॅ.वैभव गाडवे,म.पो.काॅ. पुष्षा मनवर यांनी सहकार्य केले. यामुळे तक्रारदार यांनी समाधान व्यक्त केले. मोबाईल गहाळ झाल्यास संबंधित पोलिस स्टेशनला तक्रार नोंदवावी.असे आवाहन सायबर पोलिस स्टेशन वाशिमच्या वतीने करण्यात आले.असे वृत्त शहर पो.स्टे. कडून मिळाल्याचे आमचे जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे यांनी कळवीले आहे.