वाशीम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे)- जळगाव जिल्हयातील ग्राम पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या भ्याड हल्लाप्रकरणी गावगुंडांवर कठोर कारवाई करण्यासह आ. किशोर पाटील यांचे निलंबन करण्याच्या मागणीसाठी व्हॉईस ऑफ मिडीया जिल्हा शाखा व साप्ताहिक विंगच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाध्यक्ष, भागवत मापारी व संदीप पिंपळकर यांच्या नेतृत्वात गुरुवार, १७ ऑगष्ट रोजी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.
निवेदनाचा आशय असा की, जळगाव जिल्हयातील पाचोरा येथील पत्रकार श्री संदिप महाजन यांच्यावर काही गुुडांनी जिवघेणा हल्ला केला आहे. हा हल्ला शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या सांगण्यावरुन गुंडांनी केला असल्याचेे संदीप महाजन यांनी म्हटले आहे. या हल्ल्यात महाजन गंभीर जखमी झाले असून त्यांचा कुटुंबाच्या जिवितास धोका निर्माण झाल्याची तक्रार महाजन यांनी पोलीसांत नोंदविली आहे. यामुळे राज्यातील पत्रकारांमध्ये तीव्र नाराजी आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून या घटनेतील गुंडांविरुध्द शासनाने कठोर कारवाई करुन गुन्हे नोंदविण्यात यावे. तसेच या हल्ल्यास प्रवृत्त करणार्या व महाजन यांना शिवीगाळ करणारे आ. किशोर पाटील यांना त्वरीत निलंबित करण्यात यावे. अन्यथा व्हॉईस ऑफ मिडीयाच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा देण्यात आला. निवेदन देतांना संघटनेचे जिल्हा पदाधिकारी विठ्ठल देशमुख, शहराध्यक्ष दिलीप अवगण, साप्ताहिक विंगचे सरचिटणीस किरण पडघान, प्रदीप सालवणकर, शंकर आडे, मुरलीधर मोरे, प्रदीप पट्टेबहादूर आदींची उपस्थिती होती.