आरमोरी:-
सुप्रीम कोर्टाचा शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या संदर्भात नुकत्याच आलेल्या निकाला वरून, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार व विधानसभा संपर्क प्रमुख दिलीप कदम आणि जिल्हा संपर्क प्रमुख केदारी, यांच्या जिल्हा नेतृत्वात दिनांक 30 मे ला सायंकाळी 6:00 वाजता देऊळगाव येथे शिवसेना कार्यकर्ते आढावा बैठक घेण्यात आली.
या कार्यक्रमाचा अवचित्य साधून माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी म्हणाले की, माननीय एकनाथ शिंदे गट व पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे गट ही वेगवेगळी झाली असली तरी शिवसेना मात्र एक आहे. आरमोरी निर्वाचिन क्षेत्र हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून या क्षेत्रात दोनदा शिवसेनेचा आमदार म्हणून मी जनतेचे कार्य केले आहे. जनतेच्या वृदयात अजूनही शिवसेना असून आपसी वादविवादात आपण न दुरावता शिवसेना या छत्रखाली कार्यकर्त्यांनी एकत्र यायला पाहिजे. भारतीय जनता पक्षा तर्फे या दोन्ही गटात अधिकाधिक दुरावा कसा निर्माण होईल. व अधिकाधिक कशी फूट पाडता येईल याकडे अधिक भर दिला जात असून तसा अपप्रचार जनतेत व मतदारात देखील जाणीवपूर्वक केला जात आहे. आपल्या काही पदाधिकारी व कार्यकर्ते मी या गटाचा तुम्ही त्या गटाचे म्हणून आपआपसाचा विरोध करीत पक्षात दरी निर्माण केली जात आहे. भारतीय जनता पार्टीचा हा जाणीवपूर्वक षडयंत्र असून याची जाणीव करून घेणे अधिक महत्वाचे झाले आहे. महाराष्ट्रातील शिवसेना हा एक मोठा प्रादेशिक पक्ष असून आपल्या पक्षाला संपविण्याचा कट भारतीय जनता पार्टी कडून केला जात आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी आताच सतर्क होऊन भारतीय जनता पार्टीच्या मनसुभ्याला यशस्वी न होऊ देता " जहाँ से जागे वही सवेरा " या म्हणी प्रमाणे पक्ष वाढीसाठी व पक्षाच्या जोडणी करिता अधिक मजबुतीने व अधिक ठाम पणाने कार्य करण्याचे आव्हाहन माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी यांनी केले.
पुढे बोलतांना ते म्हणाले की माननीय सर्वोच्च न्यायालयाने मा. एकनाथ शिंदे गट व मा. उद्धव ठाकरे गट या दोन्ही गटात असलेल्या पक्ष कुणाचा व चिन्ह कुणाचा याचा न्यायनिर्वाडा लावण्यासाठी संपूर्ण प्रकरण विधानसभा अध्यक्षाकडे वर्ग केले आहे. निर्णय अजूनही प्रलंबित असून मात्र त्याचा अपप्रचार भारतीय जनता पक्षातर्फे केला जात आहे. याचा मुख्य उद्देश म्हणजे शिवसेना पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते, व मतदार यांचा विभाजन करून पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये दरी निर्माण करण्याचा आहे. भारतीय जनता पक्षाचा हा " शकुनी " डाव असून त्याचा तीव्र शब्दात निषेधही माजी आमदार रामकृष्ण मडावी यांनी नोंदविला.
सबंधित निकालाची वाट न बघता जणू निकाल आपल्याच बाजूने लागला असल्याचा भारतीय जनता पक्षातर्फे भासवीला जात आहे. कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन, दुरावलेल्यांना जवळ करून मी या गटाचा, तुम्ही त्या गटाचे असे न करता आपण शिवसैनिक या छत्राखाली एकत्र येऊन शिवसेना पक्षाकरिता व पक्ष वाढीकरिता कार्य करायला पाहिजे. आपण प्रामाणिक व एकवटून कार्य केलो तर 2024 ला विजय आपलाच होणार असा ही सूचक उदगार डॉ. मडावी यांनी कार्यकर्त्यांना दिला.
त्यांच्या मनात असलेली पक्षा बद्दल चीं तळमळ व त्यांच्या ऊर्जा निर्माण करणाऱ्या भाषणाने " आवाज कुणाचा शिवसेनेचा " या नाऱ्यांनी कार्यकर्त्यातील जोश दिसून येत होता.
या प्रसंगी माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी, माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य कल्पना तिजारे, विद्या मेश्राम, शामादेवी सहारे सरपंच देऊळगाव , वंदना कामातकर उपसरपंच देऊळगाव, शिवसेना कार्यकर्ते कवळूजी सहारे, गोविंदा कोहपरे, वासुदेव राऊत, लोमेश हरडे, राजेश्वर राऊत, दामू निंबेकर, शामराव रोहनकर, रेवनाथ बोरकुटे, राजू भोयर, अशोक गडपायले, राजेंद्र बनपूरकर, नीलकंठ निदेकर, गणपतजी बनकर, श्रावण उईके, हरिदास सयाम, मेश्राम सूर्यडोंगरी व मोठया संख्येने गावकरी उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....