ब्रम्हपुरी:-
हिंसाचराने ग्रस्त झालेल्या मणिपूर राज्यातून एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये हिंसक झालेला जमाव दोन नग्न महिलांची धिंड काढतांना आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करताना दिसतो आहे. ही घटना मानवतेला काळीमा फासणारी असुन अत्यंत निषेधार्ह आहे. त्यामुळे या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी ब्रम्हपुरी महिला काॅंग्रेसच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फतीने राष्ट्रपती यांना निवेदन सादर करण्यात आले. व सदर घटनेचा जाहीर निषेध देखील करण्यात आला.
मणिपूर मध्ये महिलांवर झालेला हा हल्ला सुमारे तीन महिन्यांपूर्वी करण्यात आला होता परंतु आता हा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल झाल्यानंतर ही घटना जगासमोर आली आहे. या व्हिडिओमध्ये अत्यंत भेदरलेल्या अवस्थेतील या महिलांना हल्लेखोर जमावाकडून बळजबरीने पकडून ढकलला गेल्याच दिसत आहे त्यामध्ये अनेक पुरुषांचे चेहरे देखील दिसत आहेत. यावरून देशात महिला सुरक्षीत नसल्याचे स्पष्ट होत आहे असेही यावेळी महिला काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
निवेदन देतांना महीला काँग्रेसच्या शहराध्यक्षा योगिताताई आमले, माजी जि.प.सदस्या स्मिताताई पारधी, नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती सुनिताताई तिडके, नगरसेविका लताताई ठाकुर, रेश्माताई लाखानी, सुधाताई राऊत, माजी नगरसेविका जयाताई कन्नाके, विणाताई घोडपागे, जयश्रीताई कुथे, कल्पनाताई तुपट, गिताताई मेश्राम, सुरेखाताई गजभीये, जुबेदाताई शेख, विद्याताई सुखदेवे, गिताताई सोनटक्के, मंगलाताई टिकले, तनुजाताई राऊत, दिपाताई कावळे, वर्षाताई मुळे, सुरेखाताई मुळे, सिंधूताई राखडे, वैशालीताई उरकुडे, धनश्रीताई सिडाम, रंजनाताई गंडाईत, सुनंदाताई मुळे, वैशालीताई नाकतोडे यांसह महिला काॅंग्रेसच्या अन्य कार्यकर्त्या यावेळी उपस्थित होत्या.
आपल्या प्रतिक्रिया द्या....