स्थानिक भद्रावती ची कन्या व आता इंडीयन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस आणि टेकनोलॉजी तिरुअनंतपुरम, केरळ येथे PHD करत असलेली कोमल भारत गायकवाड हिने युनिव्हर्सिटी मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात देशाचे विदेश मंत्री श्री एस जयशंकर याना G20 च्या यशस्वीतेसाठी अभिनंदन करून सबका साथ सबका विकास बद्दल येणारी समस्या व आफ्रिकन देशसोबत तुलना यावर काही प्रश्न विचारून त्यांची प्रशंषा मिळविली.
कोमलचे वडील भारतजी गायकवाड हे तालुक्यात केंद्रप्रमुख पदावर कार्यरत असून आई सौ रेखा गायकवाड या जिल्हा परिषद शिक्षिका आहे.
तिने विचारलेल्या प्रश्नांची मनमोकळे पणे उत्तरे देताना विदेश मंत्री पण भारावून गेले व कोमलची प्रशंसा केली.
विशेष म्हणजे कोमल च्या भावाची पण फ्रांस येथे नूरओलॉजिस्ट मध्ये रीसर्च पर्सन म्हणून नुकतीच निवड झाली आहे.
या यशाबद्दल गायकवाड परिवाराचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.