यांचे घरून अनेक वर्षाआधी गेलेले सोने सोन्याचे ऐवज पोलीस अधिकारी नायोमि साठम याच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले.
पोलीस विभागातर्फे चंद्रपूर जिल्ह्यात अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे, त्यातील एक तक्रार निवारण दिन, 100दिवसाच्या या सुंदर उपक्रमात पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यामुळे 2006 पासुन चोरी गेलेल्या मुद्देमाल याची माहिती घेणे सुरू आहे, पोलीसानी राबविलेली मोहीम चांगली असून ती प्रत्यक्षात तक्रार नोंदविली त्या व्यक्तीची माहिती घेऊन त्याचे घरी जाऊन मुद्देमाल सुपूर्द करण्यात येत आहे. यासाठी वरोरा पोलीस स्टेशन चे उपविभागीय पोलीस अधिकारी नायोमी साटम, पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक शरद भस्मे, पोलीस हवालदार दिलीप वाले, हेड कॉन्स्टेबल तेलंग , चौहान यांनी महत्वाची भूमिका बजावत आहे.
चौकट:-
अंदाजे 2006वर्षी वरोरा शहरातील नंदनवन येथील काशिवार परिवार यांचे घरी घरी अज्ञात चोरटयांनी चोरी करून चांदीचा गणपती व काही सोन्याचे ऐवज लंपास केले होते. ते देण्यासाठी त्याच्या घरी गेले असता "देव आणि दैव" घरी परत आलेले पाहून त्यांना खूप आनंद झाला, या सर्व वस्तू महिला पोलीस अधिकारी नयोमि साटम याच्या हस्ते घेऊ असा आग्रह कशीवार परिवाराने केला. अखेर 7 मार्च रोजी पोलीस स्टेशन वरोरा येथे तो सुपूर्द करण्यात आला.