ब्रम्हपुरी:- येथील महर्षी व्यास नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ब्रम्हपुरी र.न.१०२७/२२ या संस्थेची ४ थी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक १४ सप्टेंबर २०२५ ला रोज रविवारला चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा ब्रम्हपुरीचे कार्यालयातील सभागृहात मोठ्या संख्येने सभासद यांचे उपस्थितीत संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थचे पदसिद्धअध्यक्ष मा.श्री. प्रभुजी जेठिराम वाघधरे हे होते. सर्वप्रथम संस्थेच्या संचालक मंडळाच्या वतीने महर्षी व्यास व महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन, दीप प्रज्वलित करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. यानंतर संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळाचे उपस्थित सभासदाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.त्यानंतर या कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सभासद श्री यशवंत तुकाराम दिघोरे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान संचालक यांची उपस्थिती होती संस्थेच्या वतीने संचालक मंडळा तर्फे त्यांचे शाल , श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
पतसंस्थचे संचालक मा.श्री. रविंद्रजी अलगदेवे सर यांनी प्रास्ताविक सादर केले यामध्ये पतसंस्थेच्या निर्मिती पासुन ते आजपर्यंत चा प्रगतीचा आढावा सांगितला. प्रास्तविक भाषणानंतर पतसंस्थेचे व्यवस्थापक श्री. संदिप भानारकर यांनी विषय पत्रिकेनुसार विषयानुरूप सभेला सुरुवात करण्यात आली यामध्ये सर्व प्रथम संस्थेचे दिवंगत सभासद, थोर महापुरुष व वीर जवान यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.सन २०२३- २४ या वर्षात झालेल्या मागील सभेचे इतिवृत कायम करण्यात आले.सन २०२४- २५ या आर्थिक वर्षाच्या अहवाल वाचन करण्यात आले यानंतर नफा-तोटा,ताळेबंद पत्रक लेखा परीक्षण अहवाल सभागृहात वाचन करण्यात आले.व यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी पथसंस्थचे सभेकरीता बहुसंख्येने उ सभासद बंधू आणि भगिनींचे उपस्थितीत होते.
समाजातील शिक्षक वर्ग व व्यावसायिक यांचे सोबतीने ‘तीन वर्षापूर्वी कठीण परिश्रम घेवुन महर्षी व्यास पतसंस्थचे रुपाने एक छोटेसे रोपटे लावले.आज या रोपट्याचे सुंदर वृक्षात रुपांतर झाले. दिवसेंदिवस पतसंस्थची प्रगती होऊन संस्था सलग तीन वर्ष नफ्यात आहे. ही संस्था ब्रम्हपुरी तालुका मर्यादित असून ती मर्यादित न राहता तिचा विस्तार चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक मोठ्या गावात संस्था स्थापन करण्याचा मानस संचालक मंडळातर्फे सांगण्यात आले.या विस्तारामुळे संस्थेमार्फत आपल्या समाजातील लोकांचा बचतीचे सवय झाली पाहिजे व यातून त्यांची आर्थिक उन्नती झाली पाहिजे. याकरिता पतसंस्थे मार्फत विविध प्रकारच्या ठेवी व जीवन समृद्धी योजना संस्थेचे मार्फत राबवून जास्तीत जास्त सभासद वाढविण्याचे आवाहन यावेळी पतसंस्थचे अध्यक्ष श्री. प्रभूजी वाघधरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.
सभेचे संचालन श्री संदीप भानारकर यांनी केले तर आभार प्रदर्शन संचालक श्री आनंद शिवरकर सर यांनी मानले. यावेळी पतसंस्थेचे संचालक अनिल पचारे,नत्थुजी चांदेकर, प्रमोद दिघोरे, रवींद्र अलगदेवे, युवराज इडपाते,स्वप्नील अलगदेवे,संचालिका ग्रीष्मा दिघोरे, वैशाली चाचीरे, व संस्थेचे व्यवस्थापक संदिप भानारकर, मुकेश भानारकर, करिष्मा डहारे तथा पतसंस्थेचे दैनिक प्रतिनिधि व बहुसंख्येने सभासद यांची उपस्थित होती. सभा समाप्ती घोषणा करण्यात आली.व उपस्थित संचालक सदस्यांना व सभासदांना अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली.