वाशिम - जिल्ह़याचे मुख्यालय असलेल्या वाशिम शहरात अनेक भुमाफीयांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरुन ले-आऊट मंजुर करुन घेतले. मात्र, या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सोईसुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या नाहीत. विशेष् म्हणजे, अशा ले-आऊटमध्ये कोणतीही पुर्वपरवानगी न घेता अनधिकृतपणे बांधकाम करण्यात येत आहेत. त्यामुळे नविन ले-आऊटमध्ये मुलभूत सुविधा उपलब्ध करुन दयाव्यात व बेकायदेशीर बांधकामांना त्वरीत पायबंद घालावा. अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख डॉ. विशाल सोमटकर यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाव्दारे केली आहे.
शिवसेना शहरप्रमुख डॉ. सोमटकर यांच्या नेतृत्वात देण्यात आलेल्या निवेदनानुसार, मागील काही वर्षात शहराचे विस्तारीकरण झपाट़याने होत आहे. या संधीचे सोने करत शहरात भुमाफीया सक्रीय झाले. त्यानुसार शहरा लगतची शेत जमिन घेवून ती अकृषक करण्याचा सपाटा सुरु आहे. यापुढे जात प्रशासनातील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरुन ले-आऊटमध्ये पाडून अव्वाच्या सव्वा दराने विक्री केल्या जातात. शहराच्या चोहू बाजूने भुमाफीयांचे जाळे पसरले असून अनेक ले-आऊटमध्ये मंजुर नकाशा प्रमाणे बांधकाम केल्या जात नाही तर अनेक महाभागांनी परवानगी नसताना सदरनिका उभारण्याचा सपाटा सुरु केला. यासाठी ग्राहकांना विविध सुविधा पुरवण्यासोबतच अनेकानेक प्रलोभणे दिल्या जात असल्याने ग्राहक अशा प्रलोभनांना बळी पडतात. प्रत्यक्षात मात्र, ले-आऊटमध्ये रस्ते, नाल्या, पथदिवे असो वा पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याची ओरड फसगत झालेले ग्राहक करीत आहेत. त्यामुळे शहरात नव्याने मंजुर ले-आऊटमध्ये सुरु असलेल्या अनधिकृत बांधकामे थांबवून जबाबदार व्यक्तींविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली. यावेळी उपजिल्हाप्रमुख युवा सेना सुमित गोटे, शाम खरात, राजु पुण्यवाड, सुरिंदरसिंग सेठी, अब्दुल आकीब, संदिप कांबळे, आर्यन गवई तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.