तालुक्यातील सर्वसाधारण नागरिकांना बांधकाम करीत असतांना वाळूच्या येणाऱ्या अडचणीची दखल घेत आम आदमी पार्टी ब्रम्हपुरी तर्फे वाहतूक चौकी लावत वाळू डेपो सुरु करण्यात यावे व वाळू चोरीला प्रतिबंध आणत नागरिकांना अल्प दरात वाळू मिळवून देण्यात यावी अशी मागणी तहसीलदार ब्रम्हपुरी यांना निवेदना द्वारे करण्यात आली.
ब्रम्हपुरी तालुक्याच्या सभोंवताल वैनगंगा नदीचे मोठे असून देखील घाट लिलाव प्रक्रिया व शासनाची वाळू घाट डेपो योजनाची प्रक्रिया तालुक्यात अपूर्ण असल्याने बांधकाम धारकांची वाळू साठी होतं असलेली लय लूट थांबाविण्यात यावी. आजघडीला तालुक्यात वाळू घाट लिलाव प्रक्रिया खोळंबलेली आहे. त्यामुळे वाळू तस्करी माध्यमातून बांधकाम करणाऱ्या लोकांपर्यंत येणारी वाळू पाच ते सात हजार रुपये प्रति ब्रास अशा वाढत्या दरात येत आहे. ग्रामीण भागातील ग्रामपंचायत पदाधिकारी लोकांतर्फे अवैध वाहतुकीला आळा बसावा याकरिता तहसीलदार ब्रम्हपुरी व पोलीस स्टेशनं ब्रम्हपुरी येथे निवेदन, तक्रार अर्ज देऊन सुद्धा कुठलीही कारवाई होतं
नसल्याने ब्रम्हपुरी आम आदमी पक्षा तर्फे अर्हेर नवरगाव, पिंपळगाव, भालेश्वर, नांदगाव, नान्होरी, तोरगाव परिसरातून वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात होतं असल्याने सदर क्षेत्रात "वाहतूक चौकी" लावण्यात यावी. तालुक्यात वाळू घाट लिलाव प्रक्रिया अथवा शासकीय वाळू डेपो योजना लवकरच कार्यान्वित करून जनतेची लय-लूट थांबाविण्यात यावी अशा आशयाचे निवेदन तहसीलदार ब्रम्हपुरी यांना देण्यात आले आहे.