आरमोरी :- नेहमी सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा ,सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून अग्रेसर असणाऱ्या युवारंग तर्फे आज दिनांक १४ एप्रिल २०२२ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्य दुपारी१२:०० वाजता दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा ताक वाटपाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले व त्यानंतर रस्त्यावर झालेल्या कचऱ्याची स्वच्छता करण्यात आली.
यानंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले वाचनालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.
याप्रसंगी युवारंग चे अध्यक्ष मा. राहुलजी जुआरे, युवारंग उपाध्यक्ष मा.मनोजजी गेडाम ,कोषाध्यक्ष मा.प्रफुलजी खापरे ,युवारंग चे संघटक सुरज पडोळे, युवारंग चे सदस्य अंकुश दुमाने ,श्रीराम ठाकरे,फिरोज पठाण, करण कुथे, पंकज इंदुरकर ,अजय कुथे ,मयुर कांबळे, निखिल शेरकुरे, महेंद्र मने ,रोहित बावनकर ,प्रथमेश साळवे, विशाल चौके, लुकेश, शेरकुरे,प्रेम चौके, करणं कुकडकर, भूषण हजारे ,अनिकेत हजारे, अमर जुआरे व क्रांतीज्योती. सावित्रीबाई फुले वाचनालयातील विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....