वाशिम :
"भारताचा प्राण आहे संविधान ।
तयाला जाणून घेई घेई ॥
जाणता जाणता जाणसी स्वतःला |
तव जीवनाला अर्थ येइ.... ॥"
अशा प्रकारे संविधान गौरव करणाऱ्या अंभगाने व टाळ मृदंगाच्या गजरात,सर्व जाती धर्माची मंडळी एकतेचा संदेश संविधानावर आधारित पोवाडे, अभंग,गित गायन आणि संबळ वादन करत हर्षोल्हासात "संविधान स्विकृती दिवस" मोठ्या थाटात साजरा करण्यात आला.
वाशिम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून
पी.एस.खंदारे यांची सलग चोवीस वर्षांपासून अखंडित संविधान गौरव दिनाची परंपरा सुरू आहे,महाराष्ट्र अंनिस व मूकनायक विचार मंचाचा हा उपक्रम याही वर्षी मोठ्या थाटात साजरा करण्यात आला, महाराष्ट्र ही संत,समाज सुधारकाची भुमी आहे,वारकरी संप्रदायाचा पाया संत नामदेव महाराज यांनी घातला व गाडगेबाबा,तुकडोजी महाराज यांचे पर्यंत तो चालतो आहे.पुढेही चालू राहील.याच विचाराने प्रेरित होऊन वाशिम येथे वारकरी, किर्तनकार, कवी, गायक, शाहीर, गोधळी इ. कलावंत मंडळीच्या सहभागातून आगळा वेगळा "संविधान स्विकृती दिवस" मोठ्या थाटात संविधान सन्मान रॅली टाळ मृदंगाच्या गजरात संविधानाचा जागर करत आदर्श जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून व पुष्पहार घालून,शिवश्री विजय शिंदे पाटील,शिवश्री गजानन भोयर, शिवश्री नारायणराव काळबांडे,शेख इसाक, कृष्णा शिंदे,राजु दारोकार, जेष्ठ समाजसेवक अनंतराव जुमडे, जेष्ठ नेते अनंतराव तायडे, तेजराव वानखेडे, परिवर्तन कला महासंघाचे शेषराव मेश्राम यांच्या हस्ते पुष्पहार घालून करण्यात आली
"भारताचा प्राण आहे संविधान ।
तयाला जाणून घेई घेई ॥
जाणता जाणता जाणसी स्वतः ला |
तव जीवनाला अर्थ येई॥
असे अभंग,गित व पोवाडे, भारुड,गायन वादन करत महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महत्प्रयासाने लिहिलेल्या संविधानाचा सन्मान , सर्व जाती धर्माच्या पुढाकाराने संपन्न झालेल्या रॅली द्वारे वाशिम शहरात नवचैतन्य निर्माण झाले आहे.
"संविधानाने दिले काय ?
समता,स्वातंत्र्य बंधुता न्याय ॥"
या व अशा अनेक घोषणाचे फलक हातात घेऊन व घोषणा देत रॅलीने परिसर दणाणून गेला होता, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून सुरू झालेली संविधान गौरव रॅली,पाटणी चौक मार्गे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून "संविधान प्रास्ताविकाचे सामुदायिक वाचन" करून, उपस्थितांना समता, एकात्मता व बंधुभावाची शपथ देखील पी एस खंदारे यांनी दिली.
तसेच सहभागी सर्व कलाकार यांना "संविधान सन्मान हा पुरस्कार" देऊन यथोचित सत्कार सत्यशोधक समाजाचे पत्रकार प्रल्हादराव पौळकर,तेजराव वानखेडे,सुनील वैद्य,नाजूकराव भोंडणे,राजु दारोकार,आत्माराम वैद्य गुरूजी यांच्या हस्ते शाहीर संतोष खडसे,व समता संदेश सांस्कृतिक कला पथक,निरंजन भगत, विद्याताई भगत, विलास भालेराव,पंढरी रनबावळे, क्रांतिसूर्य बिरसा मुंडा सांस्कृतिक भजणी मंडळ रामगाव,संगीता रनबावळे, उद्धव वानखेडे, लक्ष्मण पडघान, विष्णू वानखेडे, दिगंबर इंगोले, सुनील वानखेडे, दिलीप वानखेडे, दलित मित्र बबन मोरे या सहभागी कलावंत मंडळीला देण्यात आला. मान्यवर व पुरस्कारार्थीनी मनोगत व्यक्त केले,सुत्रसंचलन लोककवी विलास भालेराव यांनी केले तर आभार नाजूकराव भोंडणे यांनी मानले.संविधान सन्मान रॅली यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र अंनिस व मूकनायक विचार मंचचे राजू दारोकार,सुखदेव काजळे, निलेश भोजणे, कुसुम सोनुने,शेख अन्सार, दतराव वानखेडे, राधाबाई गायकवाड, इंदुबाई कांबळे यांनी प्रयत्न केले. असे वृत्त आमचे जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे यांनी कळविले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....