ब्रम्हपुरी:-
गोसेखुर्द धरणाचे पाणी वैनगंगा नदीच्या पात्रात सोडण्यात आल्याने १६ सप्टेंबर रोजी वैनगंगा नदीला पुर आला होता. नदीकाठालगत असलेल्या शेतात पुराचे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात शेतातील पिकांचे नुकसान झाले आहेत. यामध्ये कोलारी, बेलगाव, देऊळगाव, दिघोरी, नांदगाव, भालेश्वर, अऱ्हेरनवरगाव, पिंपळगाव भो, सोंदरी, लाडज, चिखलगाव, चिंचोली, सावलगाव, सोनेगाव, बोढेगाव, हरदोली, बेटाळा, रणमोचन, खरकाडा, निलज, बरडकिन्ही चिचगाव, आवळगाव, मुडझा, हळदा, बोडधा, डोर्ली यांसह अन्य गावांतील शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतीचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी किसान काॅंग्रेस सेलच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी किसान काॅंग्रेस सेलचे तालुकाध्यक्ष वामन मिसार, किसान सेलचे उपाध्यक्ष श्रीहरी देवगडे, किसान सेलचे सचिव हरीदास दुपारे, कोषाध्यक्ष विलास धोटे, बाजार समितीचे संचालक अरूण अलोने, पिंपळगाव भो. येथील सरपंच सुरेश दुनेदार, उपसरपंच संदीप बगमारे, रमेश दर्वे, विठ्ठल किनेकर, मंगेश पिसे, कपिल राऊत, प्रा.डि.के.मेश्राम, अनील शेबे, दौलत कावळे, गोवर्धन डांगे, शामराव कुथे यांसह अन्य काॅंग्रेस कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....