2 फेब्रुवारी २०२४ स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे प्रा.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात विविध सामाजिक उपक्रम संपूर्ण भारतभर राबवले जात आहेत . त्यातीलच एक आगळा वेगळा विवाह सोहळा श्रीकांत कोरडे व श्रुती नवले यांचा नुकताच पार पडला . हॉटेल सेंट्रल प्लाझा येथे झालेल्या स्वागत समारंभात संस्थापक अध्यक्ष प्रा.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात नवदांपत्याने दिव्यांग विद्यार्थ्यांना व्हीलचेयर , व्हाईटकेन , ब्रेलबुक्स व शिष्यवृत्तीचे वाटप केले . या आगळ्यावेगळ्या स्वागत समारंभात अकोल्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री प्रदीप सुसतकर , दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे संस्थापक अध्यक्ष प्रा विशाल कोरडे , उपाध्यक्ष प्रा.अरविंद देव , सहसचिव डॉ.संजय तिडके , पतंजली योगपीठ हरिद्वारच्या भारती शेंडे , वर पक्षाचे विजय कोरडे , माधुरी कोरडे , वधू पक्षाचे डॉ.बाबुराव नवले , सौ.मंगला नवले , डॉ.जयप्रकाश बनकर ,प्रकृती हॉस्पिटल शहापूर चे डॉ.अनिरुद्ध जाधव व डॉ.मयुरी जाधव उपस्थित होते . जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री प्रदीप सुसतकर यांनी या आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्याचे कौतुक केले दिव्यांगांना साहित्याचे वाटप करून कोरडे परिवाराने समाजासमोर आदर्श ठेवल्याचे त्यांनी म्हटले जिल्हा समाज कल्याण विभाग दिव्यांग सोशल फाउंडेशनच्या प्रत्येक सामाजिक उपक्रमात आपला सहभाग नोंदवणार असे त्यांनी आश्वासन दिले . वर श्रीकांत कोरडे , वधू श्रुती कोरडे द्वारा व Glimpse Treasure या फोटोग्राफी कंपनी द्वारा येणाऱ्या उत्पन्नातून दरवर्षी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या माध्यमाने दिव्यांगांना साहित्य वाटप केले जाईल असे अभिवचन दिले . सदस्य राम खोडकुंभे , तपस्या गोलाईत व नीता वायकोळे यांनी संस्थेच्या रोजगार कार्यशाळेची माहिती देऊन दिव्यांगांना रोजगार कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी संस्थेच्या ९४२३६५००९० या हेल्पलाइनवर संपर्क करण्याचे आवाहन केले . सुवर्णा शेळके व संतोष शेळके यांनी आभार प्रदर्शन केले तर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अंकुश काळमेघ ,एकनाथ जायले ,अस्मिता मिश्रा ,अनामिका देशपांडे ,पूजा गुंटीवार , विशाल भोजने ,डॉ.अर्चना मोरे ,संजय फोकमारे , प्रशांत कोरडे ,विनोद देशमुख, शैलेश सपाटे व रश्मी सपाटे यांनी सहकार्य केले . सदर कार्यक्रमात दिव्यांग बांधवांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन कोरडे परिवारातर्फे करण्यात आले . या आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्याचे कौतुक सर्वत्र केले जात आहे .