चिमूर तालुक्यातील सावरी (बिड) येथिल काल रात्री च्या सुमारास सावरी परिसरात मेघ गर्जने सह पाऊस झाला. त्या मेघ गर्जनेत शेतकरी घनश्याम किसनची निखाडे यांच्या स्वतःच्या मालकीच्या शेतातील गोठ्यात वीज पडली त्यात शेती साहित्यचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामध्ये ६० पाईप १० स्प्रिंकलर सेट तसेच वखर, नांगर, रासायनिक खत्याचे व इतर शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. तर सुदैवाने कसलीही जिवीत हाणी झालेली नाहि.
तरी शासनाने लवकरात लवकर पंचनामा करुन व आर्थिक मदत करुन लवकरात लवकर आसमानी संघातून बाहेर काढण्यात यावे अशी मागणी घनश्याम किसनची निखाडे यांनी केली आहे.