कारंजा (लाड) : हिंदु धर्मा विषयी स्वाभिमानाने,परखडपणे जनजागृती करणारेआजच्या काळातील, एकमेवाद्वितीय असे प्रखर सामाजिक व्याख्याते आणि श्रीशिवप्रतिष्ठान हिन्दुस्थानचे, संस्थापक प्रमुख गुरुवर्य संभाजीराव भिडे यांचे यवतमाळ येथील व्याख्यान आटोपून, वाशीम कडे निघत असता,शनिवार दि. 29 जुलै रोजी,रात्री ठिक वाजता कारंजा येथील श्री गुरुमंदिर संस्थान मध्ये आगमन झाले.
यावेळी मोठ्या संख्येने त्यांना बघण्याकरीता, श्रीशिवप्रतिष्ठान कार्यकर्ते नागरिकांनी गर्दी केली होती. कारंजा पोलिस स्टेशनकडून श्री गुरुमंदिर परिसराजवळ चोख बंदोबस्त ठेवलेला होता. कारंजा येथील महिला कार्यकर्ते यांनी त्यांचे औक्षवाहन करून स्वागत केले आणि श्रीगुरूमंदिर संस्थान कडून शाल,श्रीफळ व श्रीगुरू माऊलीची प्रतिमा देऊन त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. व लगेचच भिडे गुरुजी वाशीमकडे रवाना झाल्याची प्राथमिक माहिती महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेला मिळाल्याचे अध्यक्ष तथा आमचे प्रतिनिधी संजय कडोळे यांनी कळविले आहे.